दोन बायका असणारा युट्युबर अरमान मलिकच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण झाले आहे. त्याची पहिली पत्नी पायल मलिकने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अरमान २० दिवसांनंतर पुन्हा बाबा झाला आहे. तो दोन जुळ्या मुलांचा बाबा बनला आहे. युट्युबर अरमान मलिकने नुकतेच हि गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियावर शेयर केली आहे.
युट्युबर अरमान मलिकच्या घरी या महिन्यामध्ये तीन छोटे पाहुणे आले आहेत, ज्यानंतर सध्या त्याचे सर्व कुटुंब खूपच आनंदी आहे. त्याची पहिली पत्नी पायल मलिकने २६ एप्रिल रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला तर दुसरी पत्नी कृतिकाने ६ एप्रिल रोजी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता.
युट्युबरने आजच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेयर करून हि आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. हॉस्पिटलमधून शेयर केलेल्या या फोटोमध्ये अरमान आणि पायलसोबत कृतिका आणि चिरायू देखील खूपच खुश दिसत आहेत. फोटो शेयर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि शेवटी पायल आई झाली. तुम्ही अंदाज लावू शकता का मुले आहेत कि मुली.
अरमान मलिकसोबत पायलने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटोंसोबत मुलाच्या जन्माची बातमी दिली आहे. हे फोटो पायलच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील आहेत, ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा फ्लॉई गाऊन घातलेला दिसत आहे. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘शेवटी तो क्षण आला.
आई असल्याचा खूप अभिमान वाटत आहे.’ तिने मुलांचे जेंडर उघड केलेले नाही. अरमान मलिकने दोन लग्न केले आहेत. तयची पाणी पाठी पायल मलिक आहे जिच्यासोबत त्याने २०११ मध्ये लग्न केले होते तर दुसरी पत्नी कृतिका मलिक आहे जिच्यासोबत त्याने २०१८ मध्ये लग्न केले होते.
View this post on Instagram