अनेक दिवसांपासून लिव इनमध्ये राहत असलेले अर्जुन रामपाल आणि गैब्रिएला डेमेट्रियड्सचे रिलेशन कोणापासून लपून राहिलेले नाही. अभिनेत्याला गर्लफ्रेंडकडून एक मुलगा देखील आहे आणि आता तो दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड आणि साउथ अफ्रीकन मॉडल गैब्रिएला डेमेट्रियड्सने आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा सोशल मिडियाद्वारे केली आहे.
गैब्रिएलाने आपले काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेयर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, रियलिटी का आर्टिफिशियल इंटेलीजेंस? मॅटरनिटी फोटोशूट समोर आल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
काजल अग्रवाल पासून दिव्या दत्ता पर्यंत अनेक सेलेब्रेटीनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. गैब्रिएला आणि अर्जुन रामपालची भेट आयपीएल पार्टीदरम्यान झाली होती. यानंतर दोघांचे हळू हळू मैत्रीमध्ये रुपांतर झाले आणि २०१९ मध्ये हे कपल एका मुलाचे आईवडील झाले. मात्र अर्जुन आणि गॅब्रिएलाने लग्न केले नाही. गॅब्रिएला लग्नाशिवाय अर्जुनच्या बाळाची आई होणार आहे. कपलच्या रिलेशनला आता चार वर्षे झाली आहेत.
माहितीनुसार गैब्रिएला डेमेट्रियड्स, अर्जुन कपूरसोबत एका चित्रपटामध्ये दिसणार आहे. या अनटाइटल्ड चित्रपटामध्ये ती ब्रिटिश-भारतीय पोलीस अधिकारीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपटामध्ये दोघांमध्ये रोमँटिक अँगल देखील दिसणार आहे.
View this post on Instagram