विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वामिका कोहली आता दोन वर्षाची झाली आहे पण अजूनही कपलने ऑफिशियली आपल्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. विराट, अनुष्का आणि वामिका ऋषिकेशमध्ये एकत्र ऋषिकेशमध्ये होते जिथे कुटुंब ट्रेक वर गेले होते. या ट्रेकचे फोटो विराट आणि अनुष्काने शेयर केले आहेत. तुम्ही देखील पहा वामिकाचे क्युट फोटो.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने २०१७ मध्ये लग्न केले होते आणि नंतर ११ जानेवारी २०२१ रोजी दोघांनी मुलगी वामिकाचे आपल्या कुटुंबामध्ये स्वागत केले. गेल्या महिन्यामध्ये कपलने वामिकाचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आपल्या मुलीबद्दल एक स्ट्रिक्ट नो फोटो पॉलिसी फॉलो केली आहे आणि अजूनपर्यंत अधिकृतपाने वामिकाचा चेहरा दाखवलेला नाही. या फोटोमध्ये देखील वामिकाचा चेहरा पाहायला मिळत नाही आहे.
हे फोटोज विराट-अनुष्काने काही वेळापूर्वी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत. या फोटोमध्ये सर्वात पुढे अनुष्का आहे आणि मागे विराट आहे, जो मुलगी वामिकाला पाठीवर बसून ऋषिकेशमध्ये ट्रेक करत आहे.
ऋषिकेशमध्ये काढलेल्या या फोटोमध्ये मुलगी वामिका तिचे वडील विराट कोहलीच्या कुशीमध्ये आहे आणि क्रिकेटर तिला पाण्याला स्पर्श करत आहे. वामिका या ट्रिपला इंजॉय करताना दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही वामिका कोहलीचा चेहरा तर पाहू शकत नाही पण त्यांचे पाय पाहू शकता. एक बेबी कॅरीयरमध्ये विराट तिला घेऊन जात आहे.
View this post on Instagram