भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माला विशेष अंदाजामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार खेळाडू आणि फाफ डु प्लेसिसच्या ठिकाणी कर्णधारपदाची धुरा सांभाळत असलेला कोहलीने पत्नी अनुष्काचे खूपच हॉट फोटो इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेयर करत मनातील गोष्ट व्यक्त केली आहे. काही मिनिटांमध्ये हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
कोहलीने उघडपणे आपल्या पत्नीचे कौतुक करताना लिहिले आहे कि मी तुझ्यावर वेडेपणासारखे प्रेम करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या सर्व काही. कोहलीने ७ फोटो शेयर केले आहेत. यामध्ये काही फोटो सुंदर आहेत ज्यामध्ये अनुष्का खूपच हॉट दिसत आहे. कमेंट बॉक्समध्ये काही वेळामध्ये चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. या पोस्टला आतापर्यंत ४६ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
विराट कोहली सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या २०२३ च्या सत्रामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये तो फाफ डु प्लेसिसच्या ठिकाणी कर्णधारपद सांभाळताना दिसत आहे. विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
त्याने ८ सामन्यांमध्ये ३३३ धावा केल्या आहेत. यावेळी आपल्या संघाने केवळ प्लेऑफमध्येच नाही तर प्रथमच विजेतेपद पटकावावे अशी कोहलीची इच्छा आहे. कोहली सुरुवातीपासून या संघाशी जोडला गेला आहे आणि आयपीएलमध्ये अनेक मोठे विक्रम त्याच्या नावावर आहेत.
View this post on Instagram