बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी चार दशके फिल्म इंडस्ट्रीवर राज्य केले. सतीश कौशिक यांचे निधन ९ मार्च २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने झाले. अभिनेत्याच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांना दु:ख अनावर झाले आहे. अनुपम खेर यांना अजून देखील विश्वास बसत नाही आहे कि त्यांची ४५ वर्षाची मैत्री आता संपली आहे.
अनुपम खेर यांनी अनेकवेळा सोशल मिडियाद्वारे आपले दु:ख व्यक्त केले आहे. अशामध्ये नुकतेच सतीश कौशिक यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ते कोलकाताच्या कालीघाट मंदिरामध्ये जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. सोमवारी सतीश कौशिक यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक कलाकर उपस्थिती होते. अनुपम खेर यांनी अभिनेत्याला श्रद्धांजलि दिली. दरम्यान अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेयर करत भावूक कॅप्शन लिहिले आहे.
अनुपम खेरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये ते दिवंगत अभिनेता सतीश कौशिक यांच्या फोटोवर फुल अर्पण करत श्रद्धांजलि देत आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘इस जिन्दगी के दिन कितने कम है’ गाणे चालू आहे.
अनुपम खेरने आपल्या या व्हिडीओसोबत भावूक करणारे कॅप्शन लिहिले आहे. अभिनेत्याने लिहिले आहे कि जा ! तुला माफ केले, मला एकटे सोडून जाण्यासाठी, मी तुला लोकांच्या हसण्यामध्ये नेहमीच शोधत राहीन, पण प्रत्येक दिवशी आपल्या मैत्रीची कमी नक्कीच जाणवेल, अलविदा माझ्या मित्रा, तुझे फेवरेट गाणे लावले आहे. तू देखील काय आठवण काढशील. ओमशांति. अनुपम खेर यांच्या या पोस्टवर युजर्स सतत कमेंट करत आहेत.
View this post on Instagram