HomeBollywoodअनन्या पांडेची बहिण अलाना पांडेच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल...पहा व्हिडीओ...

अनन्या पांडेची बहिण अलाना पांडेच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल…पहा व्हिडीओ…

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची कजिन सिस्टर अलाना पांडे आणि इवोर मैकक्रे यांचे गुरुवारी मुंबईमध्ये लग्न झाले आहे. अलाना पांडेने लॉन्ग टाइम बॉयफेंड इवोर मैकक्रेसोबत लग्न केले आहे, ज्याचे फोटोज आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. याआधी कपलच्या हळदी, मेहेंदी आणि ब्राइडल शॉवरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

कजिनच्या लग्नामध्ये अनन्या पांडे आईवडील चंकी पांडे आणि भावना पांडे सोबत उपस्थित होती. इतकेच नाही तर या लग्नामध्ये मनीष मल्होत्रा, जॅकी श्रॉफ, सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री यांच्यासह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. तसेच, आता अलाना पांडे आणि आयवर मॅक्रे यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, जे व्हायरल होत आहेत.

अलाना पांडेने लग्नामध्ये आयवरी कलरचा लेहेंगा घातला होता, ज्यामध्ये अलाना पांडे खूपच सुंदर दिसत होती. इतकेच नाही तर अलानाचा नवरा त्याच्या नवरीसोबत ट्विनिंग करत शेरवानी घातलेला पाहायला मिळाला, ज्यामध्ये तो देखणा दिसत होता.

लग्नामध्ये अलाना आणि इवोरने व्हाइट फ्लॉवर्सचे हार एकमेकांना घातले. त्याचबरोबर वेन्यूचे डेकोरेशन ब्यूटिफुल लाइट्स, व्हाइट फ्लावर्स आणि कंट्रास्टिंग ग्रीन बोटानिकलने केले होते. कपलच्या लग्नाचे फोटोज पाहून असे वाटत आहे कि यांच्या लग्नाची देक्रो थीम व्हाईट आणि गोल्डन होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by vinod (@vinodrsingh679)

यासोबत अलानाची बहिण अनन्या पांडेने देखील लग्नामध्ये मनीष मल्होत्राची प्लम ब्लू साड़ी घातली होती ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अनन्याने आपल्या या लुकचे फोटोज इंस्टाग्रामवर देखील शेयर आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मुलगीवाले तयार आहे!”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Buzz (@bollytellybuzz)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts