रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याची राधिका मर्चंटसोबत एंगेजमेंट झाली आहे. अनंत अंबानी आणि राधिकाची एंगेजमेंट सेरेमनी मुकेश अंबानीच्या मुंबई स्थिती एंटीलिया घरामध्ये झाली. अनंत आणि राधिकाच्या एंगेजमेंट प्रसंगी एंटीलियाला सजवण्यात आले होते. अनंत आणि राधिकाची एंगेजमेंट जुनी परंपरा गोल धना आणि चुनरी विधिने झाली. या प्रसंगी मुकेश अंबानीचे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले.
एंगेजमेंट समारोहाच्या समोर आलेल्या फोटोमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानीसोबत मुलगी ईशा अंबानी आणि जावई आनंद पीरामल देखील पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका देखील दिसत आहेत.
वास्तविक मुकेश अंबानी आणि नीता अंबानीचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. कपल लवकरच एका शानदार सोहळ्यामध्ये विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या अंबानी आणि मर्चंट कुटुंबामध्ये प्रे वेडिंग फंक्शन सुरु झाले आहे. एंगेजमेंटचा कार्यक्रम मुकेश अंबानीच्या मुंबई स्थित घरामध्ये संपन्न झाला. राजस्थानच्या नाथद्वारा च्या श्रीनाथ जी मंदिरामध्ये २९ डिसेंबर २०२२ रोजी अनंत आणि राधिकाचा रोका सेरेमनी झाला होता.
मुकेश अंबानीचा लहान मुलगा अनंत अंबानीचा जन्म १० एप्रिल १९९५ रोजी झाला होता. तो रिलायन्स न्यू एनर्जी बिझनेसची जबाबदारी सांभाळत आहे. सध्या तो रिलायंस ०२c रिलायंस न्यू सोलर एनर्जीचा डायरेक्टर आहे तर त्याची होणारी बायको राधिका देखील आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत करते.
अंबानी कुटुंबात धाकटी सून म्हणून प्रवेश करणारी राधिका ही उद्योगपती वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंटचे वडील एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत आणि त्यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. राधिकाचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेली. तेथे तिने राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला.
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, २०१७ मध्ये, ती इस्रावा टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून सामील झाली. शास्त्रीय नृत्याव्यतिरिक्त तिला वाचन, ट्रॅकिंग आणि पोहणे आवडते. राधिका तिच्या वडिलांच्या एनकोर हेल्थकेअरच्या संचालक मंडळावरही आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram