बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी यांच्या रिलेशनच्या चर्चा सध्या जोरदार होत आहेत. रिलेशनच्या चर्चांमध्ये आता दोघे पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.
दरम्यान कॅमेऱ्यापासून दूर राहण्यासाठी नव्या आपले तोंड लपवताना दिसून आली. पण शेवटी ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. माहितीनुसार सिद्धांत चतुर्वेदी एका निर्मात्याला भेटण्यासाठी वांद्रे येथे पोहोचला होता. नेहमीप्रमाणे कॅमेरावाले त्याचा फोटो घेण्यासाठी त्यांच्या मागे धावू लागले.
सिद्धांतची कार जेव्हा कार्यालयाबाहेर थांबली तेव्हा कॅमेरावाल्यांना पाठीमागच्या सीटवर कोणीतरी बसल्याचे दिसून आले. यावेळी मागे बसलेली व्यक्ती कॅमेऱ्यामध्ये आपला चेहरा दिसू नये म्हणून आपले तोंड लपवू लागली. पण कॅमेऱ्यामध्ये तिचा चेहरा कैद झालाच.
कारच्या पाठीमागच्या सीटवर बसलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा असल्याचे समोर आले. कॅमेरामन तिचा फोटो घेऊ नये म्हणून ती सीटच्या पाठीमागे जाऊन लपली.
नंतर सिद्धांतच्या ड्रायव्हरने घाईघाईने गाडी पुढे घेतली. बिग बीची नात आणि सिद्धांत चतुर्वेदी अनेकवेळा एकत्र पाहायला मिळत आहेत. सध्या त्यांच्या रिलेशनच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत असल्या तरी अजून त्यांच्याकडून याबद्दल कोणतेही ऑफिशियल वक्तव्य आलेले नाही.