HomeBollywood“...म्हणून मी जयासोबत लग्न केलं” अमिताभ बच्चन यांनी सांगितलं लग्न करण्याच खरं...

“…म्हणून मी जयासोबत लग्न केलं” अमिताभ बच्चन यांनी सांगितलं लग्न करण्याच खरं कारण…

कौन बनेगा करोडपती १४ चा भाग त्याच्या मागील भागांपेक्षा खूपच खास आहे. शो मध्ये आलेल्या स्पर्धकांच्या सोबत अमिताभ बच्चन खूप साऱ्या गोष्टी सांगत असतात. त्यांच्या सोबत बोलताना अमिताभ त्यांच्या बद्दल देखील अनेक गोष्टी सांगत असतात.

आता पर्यंत अनेक वेळा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आता या दिग्गज अभिनेत्याने एक नवा खुलासा केला आहे की त्यांनी अभिनेत्री जया बच्चन सोबत लग्न कोणत्या कारणाने केले होते. बिग बी च्या या वक्तव्याची खूपच चर्चा होत आहे.

सोनी टीवी चैनल ने त्यांच्या व्यावसायिक सोशल मिडिया अकाऊंट केबीसी १४ च्या संदर्भातील एक व्हिडीओ प्रोमो प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओ प्रोमो मध्ये प्रियांका महर्षी नावाची स्पर्धक अमिताभ बच्चन यांना स्वतःचा परिचय देताना दिसत आहे.

त्यादरम्यान बच्चन सांगतात की त्यांनी जया बच्चन यांच्या सोबत का लग्न केले. व्हिडीओ मध्ये बिग बी प्रियांका महर्षी ला म्हणतात की थोडे तुमच्या बद्दल सांगा. त्यानंतर ती सांगते की ती एक ब्युटी एंड वेलनेस अकॅडमी मध्ये मैनेंजर आहे.

नंतर अमिताभ बच्चन प्रियांका महर्षी च्या केसांची प्रशंसा करतात. ते म्हणतात की, देवी जी तुमचे जे केस आहेत. ते खूप सुंदर आहेत. एकदा जरा तुमचे केस दाखवाल का? त्यानंतर प्रियांका महर्षी तिच्या केसांना पुढे करून दाखवते, ज्यावर दिग्गज बच्चन तिची प्रशंसा करतात. मग ते म्हणतात की, ‘माझ्या पत्नी सोबत लग्न मी या एका कारणाने केले होते कारण तिचे केस खूप लांब होते’. सोशल मिडीयावर केबीसी १४ शी संबंधित हा व्हिडीओ खूप वायरल होत आहे. अनेक सोशल मिडिया युजर्स या व्हिडीओ ला पसंत करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts