मासिक पाळीमुळे महिलांना दर महिन्याला अशी अनेक उत्पादने वापरावी लागतात ज्याद्वारे त्या शरीरातील पिरीयड ब्लड काढून टाकू शकतात. त्यामध्ये पैड हि सर्वात सामान्य पद्धत आहे, परंतु पिरीयड कप आणि टॅम्पन देखील एक पर्याय आहे, मात्र या सर्व पद्धतींचा वापर करताना स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीचा वापर करून ते वेळोवेळी बदलावे लागतात. तथापि, एका महिलेने या बाबतीत एक अशी मोठी चूक केली कि तिला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला. जेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा चकित करणाऱ्या गोष्टी समोर आल्या.
रिपोर्टनुसार अमेरिकेच्या मैसाचुसेट्स मधील राहणारी मिलेनि गैलेज २२ वर्षांची आहे आणि अलीकडेच तिने सोशल मिडीयावर तिच्या कमी वयातील आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा तिने डॉक्टर कडे तिची शारीरिक तपासणी केली तेव्हा डॉक्टरांना चकित करणारी वस्तू मिळाली.
वास्तविक, मिलेनि ला जवळपास २ वर्षांपासून खूप समस्या होत्या ज्याच्यामुळे तिची तब्बेत सारखी बिघडत असे. डॉक्टरांनी जेव्हा तिच्या प्राईवेट पार्ट ची तपासणी केली तेव्हा त्यांना त्यामध्ये एक जुना टॅम्पन सापडला जो जवळपास २ वर्षांपासून तिच्या शरीरात होता.
मिलेनि त्या टॅम्पन ला काढायला विसरली होती. त्याच्यामुळे तिला २ वर्षांपर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागला. माहितीनुसार तिचा हा विडीओ ‘हॉलीवूड अनलॉक्ड’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे जो तुम्ही क्लिक करून पाहू शकता. तिने सांगितले कि जेव्हा ती १३ १४ वर्षांची होती, तेव्हा तिने त्या टॅम्पन चा वापर केला होता.
तिची लक्षणे लाईम रोगासारखीच होती, जी कीटक चावल्यामुळे होती. पण डॉक्टरांना दोन वर्षांच्या तपासणीत संमिश्र लक्षणे आढळून आली, त्यामुळे त्यांनाही तिचा आजार काय आहे हे स्पष्टपणे समजले नाही. तिच्या पूर्ण शरीरामध्ये वेदना होत होत्या, प्राईवेट पार्ट मध्ये देखील वेदना होत होत्या. लहान असल्यामुळे तिच्या जवळ स्त्री रोग तज्ञ च्या जवळ जाण्याचे धाडस होत नव्हते. पण नंतर डॉक्टरांच्या जवळ गेली आणि ते तिची अवस्था पाहून आश्चर्यचकित झाले. तिला टॅम्पनमधून संसर्ग होत होता आणि तो टॅम्पन हि आतून फुटत होता. उपचारानंतर तिची तब्बेत ठीक झाली.
View this post on Instagram