फोटोमध्ये रेखा सोबत दिसत असलेली हि चार मुले खूपच लोकप्रिय आहेत. त्यातील तीन मोठे स्टार झालेले आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत आणि चाहत्यांच्या आवडतीचे कलाकार आहेत. लाल रंगाच्या टी शर्ट मध्ये रेखा च्या मागे उभारलेला मुलगा प्रसिद्ध अभिनेता आहे आणि तो त्याच्या लुक मुळे महिला चाहत्यांच्यात खूपच प्रसिद्ध आहे.
तसेच चष्म्या मध्ये बाजूला दिसत असलेली मुलगी प्रसिद्ध कलाकारांची मुलगी आणि बहिण आहे. हातामध्ये टेडी बिअर घेतलेली मुलगी देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्या चित्रपट इंडस्ट्री चा भाग राहिलेल्या आहेत. पुढे बाजूला उभा असणारा मुलगा तर बॉलीवूड मधील सुपरस्टार आहे, त्याने त्याच्या पहिल्याच चित्रपटामधून गोंधळ घातला आहे.
सोशल मिडीयावर वायरल होत असलेल्या या फोटो ला लोक ओळखण्याचे आव्हान घेत आहेत. लहानपणीच्या या फोटो मध्ये खूपच प्रेमळ दिसत असलेल्या या लहान मुलांचे मोठे झाल्या नंतर बदललेला लुक पाहून त्यांना ओळखणे चाहत्यांना खूपच अवघड झाले आहे. तथापि काही लोकांनी या फोटो ला ओळखले असेल आणि काही लोकांनी अजून ओळखले नसेल.
त्यांना सांगूया कि फोटो मध्ये रेखा च्या मागे लाल टी शर्ट मध्ये उभा असणारा अभिनेता जुगल हंसराज आहे, तर दुसऱ्या बाजूला चष्मा घालून राकेश रोशन ची मुलगी सुनयना रोशन दिसत आहे. तसेच पुढे पांढऱ्या प्रिंटेड शर्ट मध्ये हसत असणारा मुलगा दुसरा कोणी नसून प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन आहे. तर टेडी बिअर मध्ये हसत असणारी मुलगी दुसरे कोणी नसून तनिशा मुखर्जी आहे.
ऋतिक रोशन अभिनेता राकेश रोशन चा मुलगा आहे आणि त्याचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ मधून प्रसिद्ध अभिनेता बनलेला आहे. सुनयना रोशन त्याची बहिण आहे. तर जुगल हंसराज ने चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे आणि हिरो म्हणून ‘पापा कहते है’ मध्ये दिसला होता. या चित्रपटामधील त्याच्या लुक ला खूप पसंत केले गेले होते. तसेच तनिषा काजोल ची बहिण आणि अभिनेता अजय देवगण ची मेहुणी आहे. ती मुखर्जी कुटुंबातून आहे, त्यांच्या अनेक पिढ्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे.