आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले होते आणि नोव्हेंबरमध्ये तिने मुलगी राहाला जन्म दिला होता. आलियाच्या गुड न्यूजने सर्वांना हैराण केले होते. आलियाने नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे कि कि तिने १२ आठवडे म्हणजे तीन महिने आपली प्रेग्नंसी का लपवली होती. त्याचबरोबर तिने हे देखील शेयर केले कि पहिल्या प्रेग्नंसीमध्ये तिला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले. प्रेग्नंसीदरम्यान देखील आलियाने खूप काम केले. तिने या फेजमध्ये फक्त अॅक्शन चित्रपट हार्ट ऑफ स्टोनचे शुटींगच केले नाही तर इतर चित्रपटांचे प्रमोशन देखील केले.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केल्यानंतर जून २०२२ मध्ये चाहत्यांसोबत गुड न्यूज शेयर केली होती तेव्हा अभिनेत्रीने आपल्या सोनोग्राफीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला होता. आलियाने मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले कि १२ आठवड्यांपर्यंत तिने आपली प्रेग्नंसी लपवून ठेवली होती कारण तिला असे करण्यासाठी सांगितले गेले होते. पण आलिया नुसार ती आपल्या वर्क कमिटमेंट्स आणि प्रोजेक्ट्समुळे मजबूर होती. यामुळे तिला स्वतःची काळजी घेण्यासोबत काम देखील करावे लागले जेणेकरून जे देखील प्रोजेक्ट्स तिने हातामध्ये घेतले होते ते पूर्ण व्हावे.
यामुळे आलियाला बेबी बंपसोबत रात्रंदिवस काम करावे लागले. त्या दिवसांना आठवत आलियाने सांगितले कि मी तेव्हा स्वतःला कोणत्याही स्थितीमध्ये बांधून ठेवण्यावर विश्वास ठेवत नव्हते, जेव्हापर्यंत माझ्या बोडीमुळे अडचण होईल. होय मी प्रेग्नंट होते, यामुळे माझ्यावर काही बंधने होती कारण प्रेग्नंसी एक अशी फेज आहे ज्यामध्ये तुम्ही काहीच अनुमान लावू शकत नाही. मी निर्णय घेतला कि जे काही होईल त्याचा सामना करायचा. माझे बेबी आणि माझी हेल्थ माझी प्राथमिकता होती. सुरुवातीपासूनच मी हि गोष्ट स्वतःला समजावत होते कि जर मला सोयीस्कर वाटले तरच मी स्वत:ला आणखी काम करायला स्वतःला पुश करेन.
आलियाने पुढे म्हंटले कि सुदैवाने प्रेग्नंसीमुळे माझ्या कोणत्याच कामामध्ये अडथला निर्माण खाला नाही. पण सुरुवातीचे काही आठवडे खूपच कठीण होते कारण मला खूप थकवा जाणवायचा आणि नेहमी उलट्या व्हायच्या. पण तेव्हा मी याबद्दल कोणाशीच बोलले नाही कारण पहिले १२ आठवडे कोणाला काहीच सांगू नये. प्रत्येकजण हेच म्हणतो. यामुळे य हि गोष्टी स्वतःपर्यंतच ठेवली. पण मी माझ्या शरीराचे ऐकत होते.
आलियाने नंतर त्या कठीण दिवसांना कसे मॅनेज केले, त्या समस्यांना कसे तोंड दिले ते सांगताना म्हणाली कि जर शॉट दरम्यान मला झोपण्याची गरज भासली तर मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन झोपायचे. शक्य तितकी विश्रांती घ्याचे. पण तुम्हाला वर्क कमिटमेंट देखील पूर्ण करायचे आहेत. हार्ट ऑफ स्टोन माझ्या पहिला हॉलीवूड चित्रपट आहे जो जानेवारी २०२२ मध्ये साईन केला होता. मी त्याचे शेड्यूल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, यामुळे मी मागे हटले नाही. मी टीम सोबत बोलले आणि त्यांनी मला आश्वासन दिले कि माझी चांगली काळजी घेतली जाईल. मी प्रेग्नंसी दरम्यान माझा पहिला अॅक्शन चित्रपटाचे शुटींग पूर्ण करण्यात सफल झाले. हि एक अशी स्टोरी आहे जी मी येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत सांगत राहीन कारण यामुळे तुम्हाला जाणीव होते कि तुमचे शरीर किती साक्षी आहे आणि मला माझ्या शरीराबदल आदर आहे.
View this post on Instagram