नवीन नाव मम्मी-पप्पा बनलेले आलिया भट्ट-रणबीर कपूर यांनी आपल्या लिटिल प्रिंसेसचे नाव जाहीर केले आहे. कपलने ६ नोव्हेंबर रोजी आपल्या गोड मुलीचे स्वागत केले होते. तेव्हापासून रणबीर-आलिया आपल्या मुलीसोबत पालकत्वाच्या या नव्या प्रवासाचा आनंद घेत आहेत. कन्येच्या आगमनाने त्यांचा आनंद सातव्या गगनाला भिडला आहे.
दोन आठवड्यांपासून कपल या विचारामध्ये होते कि मुलीचे नाव काय ठेवायचे आहे. आलियाने म्हंटले होते कि लिटिल एंजेलच्या नामकरणासाठी कोणतीही घाई केली जाणार नाही. शेवटी अनेक सजेशन ऐकल्यानंतर दोघांनी आपल्या मुलीचे नाव फायनल केले आहे. आलिया भट्टने इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेयर करून सांगितले आहे कि कपलने मुलीचे नाव काय ठेवले आहे. रणबीर-आलियाने आपल्या मुलीचे नाव राहा कपूर ठेवले आहे. तर आलियाने हे देखील सांगितले आहे कि हे नाव तिची आजी नीतू कपूरने दिले आहे.
नावाच्या घोषणेची पोस्ट शेयर करून आलियाने लिहिले आहे कि, हे नाव राहा (जे तिच्या हुशा आणि आश्चर्यकारक आजीने निवडलेले आहे) राहाचा अर्थ दिव्य पथ असा आहे. स्वाहिलीमध्ये याचा अर्थ खुश आहे, संस्कृतमध्ये राहा एक वंश वाढवणारा आहे. बांग्लामध्ये-आराम, कम्फर्ट असा आहे, तर अरबीमध्ये याचा अर्थ शांती आहे. या नावाचा अर्थ आनंद, स्वातंत्र्यता असा आहे.
आलियाने पुढे लिहिले आहे कि-तिच्या नावाप्रमाणे आम्ही जेव्हा ती उचलून कडेवर घेतले तेव्हा सर्व भावना जाणवल्या, धन्यवाद राहा, आमच्या कुटुंबाला पुन्हा जीवन देण्यासाठी. असे वाटते आहे कि आमचे आयुष्य आता पुन्हा सुरु झाले आहे. आलियाने नावासोबत एक फोटो देखील शेयर केला आहे, ब्लर केलेल्या फोटोमध्ये सर्व लक्ष मागे टांगलेल्या बार्सिलोनाच्या जर्सीवर जाते. यूनिसेफचा मार्क असणाऱ्या ड्रेसवर राहा नाव लिहिले आहे. आणि रेड लाइनिंगच्या या टी-शर्ट आणि शॉर्ट्सला फ्रेम केले आहे आणि भिंतीवर टांगले आहे. या फोटोमध्ये ब्लर दिसत असलेले रणबीर-आलिया आपल्या मुलीला घेतलेले दिसत आहेत. ताठी मुलगी राहाचे फक्त डोके दिसत हे. पण चाहते तिची पहिली झलक मानत आहेत.
आलियाने नावाच्या घोषणेसोबत फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. चाहते कमेंट करून कपलला भरभरून शुभेच्छा देत आहेत. अनेक युजर्सने नाव खूपच चांगले असल्याचे सांगितले आहे तर राहाची मावशी रिद्धिमाने कमेंट करून तिचे प्रेम दाखवले.
View this post on Instagram