HomeBollywoodअभिनेत्रीने प्रोड्युसर एकता कपूरची केली पोलखोल, म्हणाली; घाणेरड्या खोलीमध्ये...

अभिनेत्रीने प्रोड्युसर एकता कपूरची केली पोलखोल, म्हणाली; घाणेरड्या खोलीमध्ये…

लवकरच टीवी मालिका प्रतिज्ञा २ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे, या नव्या सीजन मध्ये तुम्हाला मागील भागातीलच स्टार्स पाहायला मिळणार आहेत. पहिल्या सीजन मध्ये प्रतिज्ञा ची मोठी जाऊ भूमिका केलेली अभिनेत्री अलायका देखील आपल्या जुन्या भूमिकेत दिसणार आहे. अलायका चे नाव अलीकडे चर्चेचा विषय बनलेली आहे कारण की या सीजन मध्ये येण्याआधी ३ वर्ष इंडस्ट्री मधून गायब झाली होती. तथापि तिला प्रतिज्ञा २ ची ऑफर मिळाली तेंव्हा तिने नकार दिला नाही. आता पत्रकारांसमोर बोलताना अलायका ने अचानक तिच्या इंडस्ट्री सोडून जाण्याचे कारण सांगितले. अशी कोणती गोष्ट होती की ज्या मुळे तिने इंडस्ट्री ला सोडण्याचा विचार केला होता.

आज तक सोबत बोलताना अलायका ने सांगितले की “मी एकता कपूर चा शो परदेस में है मेरा दिल मालिका करत होते, त्यावेळी सेट वर ज्याप्रकारे मला वागणूक मिळाली त्याला पाहून मी या इंडस्ट्री ला सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता.” एकता कपूर च्या सेट बद्दल बोलताना अभिनेत्रीने सांगितले की ‘तिथे तर स्पॉट दादा देखील स्वतः ला निर्मात्या पेक्षा कमी समजत नाहीत. एकता कपूर मैम ला काहीही माहिती नसते की सेट वर कोणासोबत कोणत्या प्रकारचा व्यवहार करतात. तिथे मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकारांना मोठी वैनिटी दिली जाते. बाकी भूमिका करणाऱ्या कलाकारांना एका घाणेरड्या खोलीमध्ये जागा दिली जाते”.

त्यापुढे बोलताना ती सांगते की “हे सगळे पाहून मला असे वाटत होते की असे का केले जाते, एका मुख्य कलाकाराला चांगली वागणूक आणि बाकी कलाकारांना सोबत अशी वागणूक, काम तर आम्ही देखील करतो, आमचे सारे इनपुट देत असतो.”

त्यासोबतच अभिनेत्रीने पैसे वेळेवर न मिळण्याबाबत देखील सांगितले, तिने सांगितले की “तीन महिन्या नंतर कामाचे पैसे मिळतात, तोपर्यंत आम्ही स्वतः च्या पैशांनी खर्च भागवतो. आम्ही चांगले काम करून आमचे बेस्ट देण्यात आमचा जिव पणाला लावतो, वेळेवर येतो, मेकअप करून तयार राहतो चित्रीकरण करण्यासाठी, आम्ही देखील तेच करतो जे मुख्य भूमिका करणारे करतात मग बाकी कलाकारांसोबत भेदभाव का केला जातो?”.

त्यानंतर तिने हे देखील सांगितले की तिने प्रतिज्ञा २ साठी ती तयार का झाली “अशातच मला प्रतिज्ञा २ ची ऑफर आली आणि मी स्वतः थांबवू शकले नाही. या मालिके मध्ये मला जास्त भूमिका नाही परंतु इथे सर्वांसोबत एक सारखा व्यवहार केला जातो. जी वागणूक कृष्णा आणि प्रतिज्ञा ला मिळते तिचा वागणूक सर्वांना मिळते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts