भारतीय टीमचा स्टार ऑलराउंडर अक्षर पटेल गुरवारी मेहासोबत विवाहबंधनात अडकला. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत आणि अक्षर पटेल आणि मेहा खूपच सुंदर दिसत आहेत. या फोटोंमध्ये पाहू शकता कि कपल पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अक्षर पटेल आणि मेहा पटेल यांनी गेल्या वर्षी २० जानेवारी रोजी एंगेजमेंट केली होती आणि आता दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. अक्षर पटेल आणि मेहा पटेलने संगीत सेरेमनी मध्ये खूपच सुंदर डांस परफॉरमेंस देखील केला.
अक्षर पटेलच्या पत्नीबद्दल बोलायचे झाले तर ती व्यवसायाने आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ञ आहे. ती सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय राहते आणि आपले फोटो शेयर करते. अक्षर गेल्या काही काळापासून उत्कृष्ट कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान कायम ठेऊन आहे. अक्षरने चेंडू आणि बॅट या दोन्ही बाजूंनी चमकदार कामगिरी करत भारतासाठी अनेक वेळा सामने जिंकले आहेत.
अक्षर पटेलने याच वर्षी सुरुवातीला श्रीलंका विरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळली होती, ज्यामध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. भारतीय संघाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका क्लीन स्वीप करत जिंकली. आता भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. अक्षरने लग्नासाठी या दोन्ही मालिकांमधून ब्रेक घेतला आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, २०१४ मध्ये पदार्पण करणाऱ्या अक्षरने आतापर्यंत ८ कसोटी, ४९ एकदिवसीय आणि ४० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे ४७, ५६ आणि ३७ विकेट घेतल्या आहेत.
Axar Patel got moves.
Many congratulations to them! pic.twitter.com/0xJKAXX2Cc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 26, 2023
View this post on Instagram