भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येच्या बातमीने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. वाराणसी स्थित सोमेंद्र हॉटेलमध्ये तिचा मृतदेह सापडला आहे. माहितीनुसार अभिनेत्री वाराणसीमध्ये नायक चित्रपटाचे शुटींग करत होती. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
आकांक्षाच्या अगोदर भोजपुरी अभिनेती रुबी सिंहने १२ वर्षांपूर्वी मुंबईमध्ये आत्महत्या केली होती यानंतर अंजलि श्रीवास्तवने देखील आत्महत्या केली आहे. अभिनेत्री आकांक्षा दुबेने इंस्टाग्रामवर लाईव केले होते. व्हिडीओमध्ये ती रडताना दिसली होती.
आता तिचे अनेक चाहते दावा करत आहेत कि तिने या लाईव व्हिडीओ नंतर आत्महत्या केली. तथापि YesMarathiLive या व्हिडीओची पुष्टी करत नाही. आकांक्षा दुबेने भोजपुरी चित्रपटामध्ये खूपच कमी काळामध्ये आपली एक ओळख बनवली होती. राकेश मिश्राच्या तू जवान हम लइका मधून तिने आपल्या करियरची सुरुवात केली होती.
हा म्युझिक व्हिडीओ खूपच सफल राहिला होता. यानंतर आकांक्षाने बुलेट पे जीजा, करवटिया सारख्या अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये भोजपुरीच्या प्रत्येक कलाकारासोबत काम केले आहे. आकांक्षाने आतापर्यंत मेरी जंग मेरा फैसला, मुझसे शादी करोगी, वीरो के वीर, कसम पैदा करने वाली की २ आणि ससुरा बड़ा सतावेला सारखी भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Bhojpuri actress Akanksha Dubey committed suicide in a hotel in Banaras..
Last night live video viral on #socialmedia..#Varanasi #Bhojpuri #AkankshaDubey #akankshadubey #viral #viralnews #Sarnath #bhojpuriactress #bhojpuri #varanasipolice #Varanasi #UPPolice pic.twitter.com/ZOPCOJT5YJ
— Siraj Noorani (@sirajnoorani) March 26, 2023