भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे काही महिन्यांपूर्वी एका बाळाचे वडील झाला आहे. रहाणे ने त्याबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांसोबत आधीच शेअर केली होती, परंतु आता त्याने त्याच्या बाळाची झलक देखील चाहत्यांना दाखवली आहे. रहाणेची पत्नी राधिका धोपावकर ने तिच्या ओफ़िशिअल इंस्टाग्राम वरून बाळाचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच त्याने बाळाच्या नावाचा देखील खुलासा केला आहे.
राधिका ने त्यांच्या बाळाचे दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामधील एका फोटो मध्ये मुलगा आणि मुलगी दोघे दिसत आहेत या फोटोंना शेअर करत राधिका ने लिहिले आहे की – आर्या चा धाकटा भाऊ “राघव रहाणे”. म्हणजेच अजिंक्य रहाणे आणि राधिका ने त्यांच्या बाळाचे नाव राघव ठेवले आहे.
अजिंक्य रहाणे च्या मुलाचा जन्म ५ ऑक्टोंबर २०२२ ला झाला आहे. अजिंक्य आणि राधीकाचे हे दुसरे अपत्य आहे. याच्या आधी ते ५ ऑक्टोंबर २०१९ ला एका मुलीचे आई वडील बनले होते. रहाणे ने त्यांच्या मुलीचे नाव आर्या ठेवले आहे. रहाणे च्या दोन्ही मुलांचा जन्म एकाच दिवशी ५ ऑक्टोंबर ला आहे.
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांचे लग्न २६ सप्टेंबर २०१४ ला झाले आहे, ज्यानंतर २०१९ मध्ये त्यांच्या घरी पहिले अपत्य मुलीचा जन्म झाला. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांचे प्रेम प्रकरण तुम्हाला बॉलीवूड चित्रपटांची आठवण करून देतात, जिथे लहानपणीचे मित्र एकमेकांसोबत खूप प्रेम करतात. अजिंक्य आणि राधिका शेजारीच राहायचे.
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर दोघांचे स्वभाव एकदम विरुद्ध होते, परंतु ते दोघे चांगले मित्र बनले, चित्रपटाप्रमाणे हे दोघे मोठे झाल्यावर एकमेकांना खूप पसंत करू लागले. अजिंक्य एक प्रामाणिक माणूस आहे, परंतु डेटिंग च्या वेळी तेवढा लाजत नसे. ते मित्रांप्रमाणे भेटत आणि वेळ घालवत असत.
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांच्या कुटुंबियांना एकमेकांच्या बद्दल आवडीचा आभास झाला, ज्यामुळे त्यांनी हे प्रकरण त्यांच्या हातामध्ये घेतले. त्यांनी दोघांना विचारले की काय ते दोघे सोबत राहू इच्छितात. तेंव्हा या प्रेमी जोडप्याने त्यांच्या प्रेमाची कबुली त्यांच्या कुटुंबियांच्या समोर दिली. तसेच, अजिंक्य ने हिरव्या पायजम्यासोबत सोनेरी शेरवानी घातली होती.
अजिंक्य रहाणे सध्या तीन पैकी कोणत्याही फोरमेट मध्ये भारतीय संघाचा भाग नाही. त्याला खेळातील सर्वात लांब फोरमेट मध्ये खराब प्रदर्शनामुळे त्याला वगळण्यात आले. तो बांग्लादेश दौऱ्यात देखील संघाचा भाग नाही. तथापि, त्याला रणजी ट्रॉफी साठी मुंबई संघाचा कर्णधार निवडण्यात आले आहे. त्याला काही दिवसानंतर पुन्हा क्रिकेट खेळताना पाहू शकतो.
अजिंक्य रहाणे शेवटचे जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका च्या दौऱ्यात भारताकडून खेळला होता. टीम मधून बाहेत झाल्या नंतर रहाणे या वर्षी इंडियन प्रीमियर लीग मध्ये कोलकाता नाईट राईडर्स साठी खेळला होता. रहाणे ने आता पर्यंत ८२ टेस्ट, ९० वनडे आणि २० टी २० मैचेस खेळले आहेत. तथापि, त्याने फेब्रुवारी २०१८ पासून पांढऱ्या चेंडू चा खेळ खेळला नाही. रहाणे ने आता पर्यंत ८००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा काढल्या आहेत, ज्यामध्ये १५ शतके आणि ४९ अर्ध शतकांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणे ने ऑस्ट्रेलिया च्या विरुद्ध २०२०-२१ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मध्ये ऑस्ट्रेलिया वर एक प्रसिद्ध विजय मिळवत भारताचे नेतृत्व केले होते. मालिकेतील पहिल्याच मैच मध्ये पराभवानंतर भारताने ऑस्ट्रेलिया ला २-१ ने हरवून दुसरी कसोटी मालिका जिंकली होती.
View this post on Instagram