अजय देवगन सध्या त्याच्या भोला चित्रपटामुळे चर्चेमध्ये आहे. या चित्रपटाला सध्या मिलता जुळता रिस्पॉन्स मिळत आहे. अजय देवगनने २२ व्या वर्षी फूल और कांटे चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. अजय देवगनला त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. अजय देवगन आज त्याचा ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे.
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या अजय देवगनची एकूण संपत्ती ५७२ करोड इतकी आहे. त्याची मुख्य कमी चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून होते. अजय देवगन एका चित्रपटासाठी ४० ते ५० करोड रुपये फी घेतो. अभिनेत्याने गंगूबाई काठियावाडी चित्रपटामधील छोट्या भूमिकेसाठी ११ करोड रुपये फी घेतली होती. तर एसएस राजामौलीच्या RRR’मधील कॅमिओ भूमिकेसाठी अजय देवगणने २५ कोटी रुपये घेतले होते.
अजय देवगन आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या जुही भागामध्ये एका आलिशान बंगल्यामध्ये राहतो. चार बेडरूम असणाऱ्या या बंगल्यामध्ये जिम, प्राईव्हेट स्विमिंग पूल, स्पोर्ट्स रूम, लाइब्रेरी शिवाय एक मिनी थियेटर देखील आहे. अजय देवगन महादेवाचा मोठा भक्त आहे. त्यामुळे त्याने आपल्या घराचे नाव शिवशक्ति ठेवले आहे. या बंगल्याची किंमत जवळ जवळ ३० करोड रुपये इतकी आहे. तर लंडनमध्ये देखील अभिनेत्याने एक बंगला खरेदी केला आहे आहे ज्याची किंमत ५५ करोड रुपये आहे.
अजय देवगनला लक्झरी कार्सची देखील खूप आवड आहे. २००६ मध्ये त्याने मासेराती क्वाट्रोपोर्टे खरेदी केली, हि कार खरेदी करणारा तो पहिला भारतीय होता. त्यावेळी या कारची किंमत जवळ जवळ २.८ करोड इतकी होती. याशिवाय त्याच्याजवळ रेंजरोवर वोग आहे ज्याची किंमत २.७ करोड उक्ती आहे. अजय देवगनजवळ मर्सीडीज बेंज एस क्लास देखील आहे ज्याची किंमत १.४ करोड आहे. अजय देवगनजवळ रॉल्स रॉयस कलीनन देखील आहे ज्याची किंमत जवळ जवळ ६.९५ करोड इतकी आहे.
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये काही निवडक कलाकारांकडेच स्वतःचे प्राईव्हेट जेट आहे. यामध्ये अजय देवगनचे देखील नाव सामील आहे. २०१० मध्ये अजय देवगनने हॉकर ८०० नावाचे जेट खरेदी केली होते. ज्याची किंमत जवळ जवळ ८४ करोड रुपये सांगितली जाते. अजय देवगन नेहमी याचा वापर आउटडोर शूटिंग्स, प्रमोशन्स आणि कौटुंबिक सहलीसाठी करतो.
अजय देवगनचे खरे नाव अजय नसून त्याचे नाव विशाल विरू देवगन आहे. अजयने आपल्या खऱ्या नावाचा खुलासा करत म्हंटले होते कि जेव्हा बॉलीवूडमध्ये तो डेब्यू करणार होता तेव्हा त्यावेळी आणखी तीन विशाल नावाचे अभिनेते चित्रपटामध्ये काम करत होते. अशामध्ये त्याच्याजवळ नाव बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.