HomeBollywoodवय लपवण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चनने घेतले इंजेक्शन नेटकऱ्यांच्या लक्षात येताच उडवू लागले...

वय लपवण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चनने घेतले इंजेक्शन नेटकऱ्यांच्या लक्षात येताच उडवू लागले खिल्ली म्हणाले; म्हातारी झाली तरी अजून हिची…

ऐश्वर्या राय बच्चनच्या पोन्नियन सेल्वन-१ चित्रपटाची चाहते आतुरतेने वात पाहत आहेत. आता अखेर पोन्नियन सेल्वन-१ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. पोन्नियन सेल्वन-१ चित्रपट मणिरत्नमने दिग्दर्शित केला आहे. चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय शिवाय साउथ चित्रपटाचे स्टार विक्रम सहित अनेक मोठे कलाकार आहेत. मंगळवारी पोन्नियन सेल्वन-१ चा ट्रेलर रिलीजचा एक मोठा इवेंट ठेवण्यात आला होता. यादरम्यान ऐश्वर्या बच्चनचा गॉर्जियस लुक देखील पाहायला मिळाला. तथापि अभिनेत्रीचा हा लुक अनेक लोकांना पसंद आला नाही.

ऐश्वर्या रायचे फोटोज आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे. तिने ब्लॅक कलरचा सूट घातला आहे. यासोबत तिने सिल्वर कलरचा डिझाईन दुपट्टा देखील कॅरी केला आहे. यासोबत अभिनेत्रीने सिल्वर प्लेटेड ज्वेलरी देखील कॅरी केली आहे. जी तिच्या लुकमध्ये आणखीनच भर घालत आहे. तथापि ऐश्वर्या राय बच्चनला या लुकबद्दल ट्रोल देखील केले जात आहे.

सोशल मिडिया युजर्स ऐश्वर्या राय बच्चनच्या या लुकची खूप खिल्ली उडवत आहेत. युजर्सचे म्हणणे आहे कि ऐश्वर्याने जास्त बोटॉक्स केले आहे. इतकेच नाही तर तिच्या लिप्स शेप आणि चीक्स शेपची देखील खिल्ली उडवली जात आहे. अनेकी लोक अभिनेत्रीच्या वजनावरून देखील तिची टिंगल उडवत आहेत.

पोन्नियिन सेलवनची स्टोरी कल्कि कृष्णमूर्ति यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपट चोल राजघराण्यातील राजाराजा चोल प्रथमच्या जीवनावर आधारित आहे. पीएस १ मध्ये सरथकुमार, प्रभु, लाल, किशोर, अश्विन काकुमानु आणि ऐश्वर्या लक्ष्मी देखील मुख्य भूमिका करत आहेत.

हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट हिंदी, तेलगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाची निर्मिती मद्रास टॉकीज आणि लाइका प्रोडक्शंसच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts