HomeBollywoodबॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा फेक पासपोर्ट जप्त, पोलिसांनी केली मोठी कारवाई...

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा फेक पासपोर्ट जप्त, पोलिसांनी केली मोठी कारवाई…

एनसीआरच्या ग्रेटर नोएडामध्ये एका औषध कंपनीच्या नावावर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. जिथे नायजेरियन असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार या टोळीने सुमारे १.८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

इतकेच नाही तर पोलिसांना या टोळीकडून बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा बनावट पासपोर्ट देखील मिळाला आहे. सध्या या प्रकरणामध्ये चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान हे जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे कि या बनावट पासपोर्टसोबत हि टोळी काय करणार होती.

हि टोळी महागड्या किमतीत औषधी वनस्पती खरेदी करण्याचे आश्वासन देत असे. याशिवाय ही टोळी मॅट्रिमोनिअल साइट्स आणि डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून लोकांना टार्गेट करत असे. मिळालेल्या माहितीमध्ये हे समोर आले आहे कि अभिनेत्री ऐश्वर्या रायचे नाव वापरून यांनी नाइजीरियन देशाच्या वेगवेगळ्या भागामधील लोकांची फसवणूक केली आहे.

हि टोळी प्रोजेक्ट्स विकते आणि लोकांना याचा विश्वास देते कि त्यांचे प्रोडक्ट ऐश्वर्या देखील वापरते. ऐश्वर्या रायचे नाव घेऊन हे लोक त्यांना आपल्या जाळ्यामध्ये फासते. या फसवणुकीत एक निवृत्त कर्नलही सामील होता.

मिळालेल्या माहितीनुसार या टोळीजवळ ३ हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच २.५० लाख रुपये, १०५०० पौंड (यूके चलन) आणि 11 कोटी रुपयांच्या बनावट चलनासह अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच या टोळीकडून ऐश्वर्या रायचा फोटो असलेला बनावट पासपोर्टही सापडला आहे. आता या टोळीने इतर अनेक सेलिब्रिटींची बनावट कागदपत्रे तयार केली आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts