HomeBollywoodआदिपुरुषमध्ये श्रीरामाची भूमिका करण्यापूर्वी खूपच घाबरला होता प्रभास, म्हणाला; माझ्याकडून एखादी चूक...

आदिपुरुषमध्ये श्रीरामाची भूमिका करण्यापूर्वी खूपच घाबरला होता प्रभास, म्हणाला; माझ्याकडून एखादी चूक…

बाहुबली स्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट आदिपुरुषचा टीझर रिलीज झाला आहे. सध्या या चित्रपटाबद्दल खूपच चर्चा होत आहे. टीझरला मिळताजुळता प्रतिसाद मिळत आहे. कहो लोक टीझर पाहून खूपच उत्साहित झाले आहेत. अनेक जणांनी चित्रपटाला VFX मुळे ट्रोल केले आहे. याद्म्र्यान आता प्रभासबद्दल एक माहिती समोर आली आहे.

बाहुबली स्टार प्रभासला श्रीरामाच्या अवतारामध्ये पाहून त्याचे चाहते खूपच खुश आहेत. प्रभासचे ट्रांसफॉर्मेशन लोकांची मने जिंकत आहे. तसे सिल्वर स्क्रीन श्रीरामाची भूमिका करणे खूपच आव्हानात्मक असते. यावेळी प्रभाससाठी हि भूमिका खूपच कठीण होती.

तुम्हाला माहिती नसेल कि प्रभासने हि गोष्ट स्वतः मान्य केली आहे कि श्रीरामाची भूमिका करायला तो घाबरला होता. प्रभासने म्हंटले कि या रोलसाठी मी खूपच घाबरलो होतो. मी ओम राऊतला तीन दिवसांनंतर फोन केला आणि म्हंटले कि जर मी एखादी चूक केली तर…आपण हा चित्रपट खूप प्रेमाने आणि समर्पणाने बनवला आहे. श्रीराम आपल्या आशीर्वाद देवोत.

सिल्वर स्क्रीनवर श्रीरामाची भूमिका करणे कोणत्याही अभिनेत्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. पण या भूमिकेला न्याय देणे तितकेच जरुरीचे आहे. आदिपुरुषच्या रिलीजनंतर माहिती होईल कि प्रभास मोठ्या पडद्यावर श्रीरामाच्या भूमिकेमधून चाहत्यांचे मन जिंकू शकेल का नाही.

आतापर्यंत तर प्रभासचे चाहते इंप्रेस्ड आहेत. आदिपुरुषमध्ये जिथे प्रभास राम बनला आहे तर सीताच्या भूमिकेमध्ये कृती सेनन, लक्ष्मण बनला आहे सनी सिंह आणि रावणाची भूमिका सैफ अली खानने केली आहे. हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. याचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे.

प्रभाससाठी आदिपुरुष चित्रपट हिट होणे खूपच गरजेचे आहे. कारण याआधी त्याचे दोन चित्रपट फ्लॉप झाले आहेत. प्रभासच्या राधे श्याम आणि साहोचा बॉक्स ऑफिस बिजनेस फ्लॉप राहिला. बाहुबली चित्रपटाच्या सुपर सक्सेसनंतर प्रभासचे चित्रपट इतक्या वाईटरित्या फ्लॉप होणे सर्वांसाठी शॉकिंग आहे. अशा आहे कि प्रभास आदिपुरुषमधून सिल्वर स्क्रीन धमाकेदार पुनरागमन करेल आणि पुन्हा एकदा तो बॉक्स ऑफिस किंग बनेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts