बॉलीवूड ची दिग्गज अभिनेत्री जीनत अमान हि तिच्या काळातील सर्वात बोल्ड आणि फतकळ अभिनेत्री होती. जिथे तिने आपल्या मादक सौंदर्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली. तर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात कधीच आनंदी नव्हती. ती केवळ उत्कृष्ट चित्रपटांसाठीच नाही तर वादग्रस्थ वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखली जाते.
जीनत ने तिचे पाहिले लग्न अभिनेता संजय खान सोबत केले होते, परंतु तिचे त्याच्या सोबत लवकरच घटस्फोट घेतला. तथापि या लग्नात जीनत ने खूप काही गमावले होते. तिने तिच्या सौंदर्यासोबतच तिचे करिअर देखील गमावले होते. मिडिया रिपोर्टनुसार, जीनत संजय चे लग्न १९७८ मध्ये झाले होते. दोघांनी अगदी गुपचूप लग्न केले होते. त्याकाळात जीनत यशाच्या शिखरावर होती. तर संजय खान आधीपासूनच विवाहित होता आणि तो तीन मुलांचा वडील होता तरी देखील जीनत त्याला मनापासून प्रेम करत होती.
काळ हा होता जिथे जीनत ने तिच्या सौंदर्याने संपूर्ण इंडस्ट्री ला वेड लावले होते. तर ती स्वतः संजयवर प्रेम करत बसली होती. मात्र या प्रेमाने तिला तोडले कारण संजय खान तिला अनेकदा मारहाण करत असे. मिडिया रिपोर्टनुसार हि प्रेम कथा तेव्हा टोकाला गेली जेव्हा संजय ने जीनत वर दिग्दर्शकासोबत अफेअर असल्याचा आरोप केला होता.
जीनत ला जेव्हा या गोष्टीची माहिती समजली तेव्हा ती लोणावळा मध्ये चित्रीकरण करत होती. संजय चे हे वक्तव्य ऐकून शुटींग सोडून ती मुंबई ला परत आली. जेव्हा ती मुंबई ला पोहोचली तेव्हा तिला समजले कि संजय त्याच्या पहिली पत्नी आणि मुलांच्या सोबत हॉटेल ताज मध्ये पार्टी करत आहे. जीनत रागात तिथे पोहोचली. जीनत ला तिथे असे पाहून संजय खान समवेत सर्व लोक चकित झाले.
संजय ने जीनत ला हॉटेल च्या रूम मध्ये बोलावले जिथे आधीपासूनच त्याची पहिली पत्नी हजर होती. अशातच दोघांच्यात खूप वादावादी सुरु झाली. संजय इतका संतापला कि त्याने जीनत ला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रूम च्या बाहेर ओरडण्याचे आवाज ऐकू येत होते परंतु तिला वाचवायाला कोणीही तयार नव्हते. नंतर हॉटेल च्या कर्मचाऱ्यांनी रक्ताने माखलेल्या जीनत ला हॉस्पिटल मध्ये दाखल केले. उपचारादरम्यान समजले कि जीनत च्या डोळ्यावर खूप जखमा झाल्या आहेत आणि तिचा जबडा देखील तुटला आहे. घटनेनंतर अनेक दिवस जीनत वर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते.