टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस १४ ची विनर रुबीना दिलैकने आपला हैराण करणारा फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये तिचा चेहरा पूर्णपणे बिघडलेला पाहायला मिळत आहे. हे फोटो पाहून चाहते देखील चिंता करत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे कि तिने एक्सपायर मेकअप यूज केला आहे. तर काही लोक रुबीना दिलैक लवकर बरी व्हावी म्हणून कामना करत आहेत. वास्तविक अभिनेत्रीची प्रकृती ठीक नाही ती आजारी आहे आणि यामुळे तिच्या चेहऱ्यावर सूज आली आहे. हेच कारण आहे रुबीना दिलैकचे चाहते चिंता करू लागले आहेत.
रुबीना दिलैकने इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक लेटेस्ट फोटो शेयर केला आहे आणि तिने सांगितले आहे कि तिला ताप, घसादुखी आणि इंफेक्शन आहे. त्याचबरोबर ओठांवर सूज देखील आहे. ती सध्या एखाद्या बदकाप्रमाणे दिसत हे. यामुळे ती खूपच नाराज झाली आहे आणि इरीटेट देखील होत आहे. त्याचबरोबर तिला स्वतःचाचा चेहरा पाहून स्वतःवर हसू देखील येत आहे.
फोटोमध्ये रुबीना दिलैकचे ओठ सुजलेले पाहायला मिळत आहेत. तिने सांगितले कि कोणत्याही फिलर म्हणजेच सर्जरी शिवाय तिचे लिप्स असे झाले आहेत. त्याचबरोबर तिच्या डोळ्यांवर सूज आणि चेहरा खूपच कमजोर दिसत आहे. जसे कि रुबीनाने सांगितले कि तिची प्रकृती ठीक्न नाही आणि यामुळे तिच्या चेहऱ्यावर खूप सूज आली आहे.
रुबीना दिलैकचे हे फोटो पाहून चाहत्यांना तिच्याविषयी चिंता लागून राहिली आहे. तर काही युजर्सनी तिची खिल्ली देखील उडवली आहे. एका युजरने लिहिले आहे कि मॅडमने एक्सपायर्ड मेकअप वापरला आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि तू असे काय खाल्लेस कि तुझ्या चेहऱ्याची अशी हालत झाली आहे. एका तर हे देखील लिहिले कि तू राखी सावंत दिसत आहेस.
View this post on Instagram