HomeEntertainmentअवघ्या २० व्या वर्षी इतक्या करोडच्या संपत्तीची मालकीण होती तुनिशा शर्मा, कमी...

अवघ्या २० व्या वर्षी इतक्या करोडच्या संपत्तीची मालकीण होती तुनिशा शर्मा, कमी वयामध्ये बनली होती प्रसिद्ध अभिनेत्री…

टीव्ही जगतामधील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिशा शर्मा आज या जगामध्ये नाही. माहितीनुसार तुनिशाने आ’त्मह’त्या केली आहे. तिने सिरीयलच्या सेटवर ग ळफा स घेऊन आ त्मह त्या केली. सध्या तिच्या आ त्मह त्येचे कारण समोर आलेले नाही. तथापि पोलीस चौकशी करत आहेत. इतक्या कमी वयामध्ये तुनिशाने इतके मोठे पाऊल उचलून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. अभिनेत्री अवघ्या २० वर्षाची होती. इतक्या कमी वयामध्ये तिने इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता मिळवली होती.

४ जानेवारी २०२३ रोजी तुनिशा आपला २१ वा वाढदिवस साजरा करणार होती. पण वाढदिवसाच्या काही दिवस अगोदरच तिने मृत्यूला कवटाळले. तुनिशाच्या कुटुंबियांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. माहितीनुसार तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. तर तिची आई, भाऊ आणि बहिण चंदीगडमध्ये राहतात.

तुनिशाला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तुनिशा अलीबाबा दास्तान-ए-काबुल सिरीयलमधून खूपच लोकप्रिय झाली होती. तुनिशाचा जन्म चंदीगडमध्ये झाला होता. तिथेच तिने आपले शालेय शिक्षण घेतले. पण पुढे अभिनयामध्ये करियर बनवण्यासाठी ती मुंबईला आली. इथे येऊन तिने फक्त नावच कमवले नाही तर अमाप संपत्ती देखील कमवली.

माहितीनुसार तुनिशाला डांस आणि अभिनयाची खूप आवड होती. तिने याच क्षेत्राला आपले करियर निवडले. तिने छोट्याश्या करियरमध्ये अनेक सिरियल्समध्ये काम केले. फक्त छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटांमध्ये देखील तिने आपले नशीब आजमावले. फितूर, बार बार देखो, कहाणी २ दबंग ३ सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले. तुनिशाच्या मित्रांची लिस्ट खूप मोठी आहे. ती खूपच हसमुख होती.

तुनिशाने इंडस्ट्रीमध्ये एक बालकलाकार म्हणून आपले करियर सुरु केले होते. भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप मधून तुनिशाने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. तेव्हापासून आतापर्यंत तिने अनेक चर्चित शोमध्ये काम केले. माहितीनुसार तुनिशा २ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १५ करोड रुपयांच्या संपत्तीची मालकीण होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts