HomeBollywoodबॉलीवूडमधून दुःखद बातमी, प्रसिद्ध अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने नि’धन, ७८ व्या वर्षी घेतला...

बॉलीवूडमधून दुःखद बातमी, प्रसिद्ध अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने नि’धन, ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. अभिनेत्री ७८ वर्षांची होती. माहितीनुसार काल संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोसाठी ती लोकप्रिय झाली होती. २१ नोव्हेंबर रोजी सांताक्रूझ येथील आर्य समाजात त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तबस्सुम गोविलला कधीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणाच्या ओळखीच गरज भासली नाही. त्यांचा त्यांचा जन्म ९ जुलै १९४४ रोजी अयोध्येत झाला होता. अभिनेत्रीने आपले शिक्षण मुंबईमध्ये घेतले होते. असा दावा केला जात आहे कि तबस्सुमने लहान वयामध्येच फिल्मी जगामध्ये प्रवेश केला होता.

ती जेव्हा स्क्रीनवर पहिल्यांदा आली होती तेव्हा ती तीन वर्षांची होती. १९४७ मध्ये रिलीज झालेल्या मेरा सुहाग चित्रपटामध्ये तिने बाल कलाकाराची भूमिका केली होती. तबस्सुमने दीदार चित्रपटामध्ये नरगिसच्या लहानपणीची भूमिका करून दर्शकांचे मन जिंकले होते. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती.

चित्रपटांशिवाय तबस्सुमचे नाव टीव्ही जगतामध्ये देखील खूप फेमस होते. तिने फूल खिले हैं गुलशन गुलशन या टीव्ही शोची सुरुवात केली होती. या शोमध्ये ती सिनेजगतामधील लोकांसोबत खास बातचीत करत होती. अभिनेत्रीच्या या शोला खूपच पसंद केले गेले. यामुळे हा शो दूरदर्शनवर एकदा दोनदा नाही तर तब्बल २१ वर्षे हा शो प्रसारित केला गेला. या शोची सुरुवात १९७२ मध्ये झाली होती आणि १९९३ पर्यंत हा शो चालू होता.

तबस्सुम गोविल आता आपल्यामध्ये नाहीत. पण २०२१ च्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांचं निधनाची खोटी बातमी देखील पसरली होती. यादरम्यान अभिनेत्रीने स्वतः पुढे येऊन हि बातमी खोटी असल्याचे सांगितले होते आणि म्हंटले होते कि हि बातमी खोटी आहे.

त्यांनी बातमी खोटी असल्याचे सांगत लिहिले होते कि आपल्या शुभेच्छांमुळे मी पूर्णपणे बरी, निरोगी आणि माझ्या कुटुंबासोबत सुखरूप आहे. हि जी खोटी बातमी पसरत आहे ती चुकीची आहे. मी प्रार्थना करते कि तुम्ही लोक देखील घरामध्ये सुखरूप आहात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts