HomeBollywood१५ व्या वर्षी डेब्यू १८ व्या वर्षी लग्न तरीदेखील एकटी राहते हि...

१५ व्या वर्षी डेब्यू १८ व्या वर्षी लग्न तरीदेखील एकटी राहते हि अभिनेत्री, पहा रोजच्या गरजा भागवण्यासाठी करते असले काम…

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार येतात आणि जातात. फक्त असे मोजकेच कलाकार असतात जे या जगतामध्ये नाव कमवण्यात यशस्वी होतात. तसे तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणे आणि जाणे हि काही मोठी गोष्ट नाही. वर्षानुवर्षे इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणे हि मोठी गोष्ट आहे.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत त्या अभिनेत्रीचे नाव सोनम आहे. सोनमचे खरे नाव हे बख्तावर खान होते. तिने मुस्लीम नाव बदलून सोनम नाव ठेवले होते. सोनम ९० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री होती. अं ड र व र्ल्डशी नाव जोडले गेल्यामुळे ममता कुलकर्णी, मंदाकिनी आणि मोनिका बेदी सारख्या मोठ्या अभिनेत्रींचे करियर बरबाद झाले होते. तर सोनमचे करियर अं ड र व र्ल्डच्या ध म क्यांमुळे संपुष्टात आले.

९० च्या दशकामध्ये सोनम फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रीय होती. सोनम आता ४९ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म २ सप्टेंबर १९७२ मध्ये मुंबईमध्ये झाला होता. ९० च्या दशकामध्ये जेव्हा खूपच कमी अभिनेत्री बो ल्ड सीन देत होत्या तिथे सोनम यामध्ये सगळ्यात अव्वल होती.

सोनमच्या फिल्मी करियरची सुरुवात विजय चित्रपटामधून झाली होती. हा चित्रपट १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा सोनम फक्त १५ वर्षाची होती. आपल्या पहिल्या चित्रपटामधून सोनमने दर्शकांचे हृदय जिंकले होते. तिने चित्रपटामध्ये अनेक बो ल्ड सीन दिले होते आणि हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

पहिल्याच चित्रपटामधून सोनम सुपरस्टार झाली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. पहिला चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. यानंतर ती १९८९ मध्ये आलेल्या त्रिदेव चित्रपटामधील ओये-ओये या गाण्यामुळे खूपच चर्चेमध्ये राहिली.

सोनम जेव्हा तिच्या करीयरच्या शिखरावर होती तेव्हा तिला अं ड र वर्ल्ड मधून ध म क्या येऊ लागल्या. सोनमला यामुळे खूप मोठा धक्का बसला आणि ती बॉलीवूडपासून दूर जाऊ लागली. लवकरच तिने फिल्म इंडस्ट्री सोडली जवळ जवळ १८ व्या वर्षी तिने निर्माता राजीव रायसोबत लग्न केले पण लग्नानंतर तिच्या पतीला देखील ध म काव ले जाऊ लागले.

अं ड र व र्ल्डच्या ध म क्यांमुळे सोनमने आणि तिचा पती राजीवने दिश सोडून विदेशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दोघे मुलगा गौरवचे आईवडील बनले. राजीव आणि सोनम लग्नाच्या २५ वर्षानंतर वेगळे झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. अनेक वर्षानंतर सोनम पुन्हा भारतामध्ये परतली. भारतामध्ये परतल्यानंतर तिने डॉ. मुरली पोडुवलसोबत दुसरे लग्न केले होते. सध्या आपल्या कुटुंबासोबत एक आनंदी आयुष्य व्यतीत करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts