HomeBollywood४०० चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रेखला पसंद आला होता ‘या’ चित्रपटाचा रे’प सीन,...

४०० चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रेखला पसंद आला होता ‘या’ चित्रपटाचा रे’प सीन, म्हणाली; ‘मला तो सीन पुन्हा…’

बॉलीवूडमध्ये आपल्या पर्सनल लाईफमुळे अनेक दशके चर्चेमध्ये राहणारी रेखाने ४५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभसोबत रिलेशन आणि बिनधास्त अंदाजासाठी प्रसिद्ध रेखाने खूप प्रसिद्धी मिळवली. आज देखील देशभरामध्ये रेखाचे लाखो चाहते आहेत. रेखाची लाईफ नेहमी कॉन्ट्रोवर्सीजने भरलेली राहिली. ३७ वर्षांपूर्वी १९८६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रेखाने आपल्या पर्सनल लाईफमधील अनेक किस्से शेयर केले. त्याचबरोबर रेखाने सांगितले कि तिचे सर्वात बेस्ट काम कोणते होते.

रेखाला जेव्हा विचारले गेले कि तिचा आवडता चित्रपट कोणता आहे. यावर उत्तर देताना रेखा म्हणाली कि तिला कोणताही चित्रपट पूर्ण आवडला नाही. पण १९७८ मध्ये रिलीज झालेल्या घर चित्रपटामधील तिचा एक रे प सीन तिला खूप आवडला होता. रेखाने मुलाखतीमध्ये सांगितले कि आतापर्यंत मी ४०० चित्रपट केले आहेत. पण मला घर चित्रपटामधील तो एकच सीन आवडला. हा सीन पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला होता कि या सीनमध्ये मी खूपच चांगले काम केले होते.

रेखाने या मुलाखतीमध्ये मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो, मुझे तुम कभी भी भुला ना सकोगे हे गाणे देखील गायले होते. हि मुलाखती आज देखील खूपच पसंद केली जाते. रेखा आणि अमिताभ बच्चनच्या अफेयरचे किस्से २ दशकांनंतर देखील खूपच चर्चेमध्ये राहतात. आज देखील रेखाचे लग्न न करण्याचे कारण अमिताभ बच्चन साठी असलेले प्रेम सांगितले जाते. तथापि यामध्ये किती तथ्य आहे हे फक्त रेखालाच माहिती आहे.

रेखाने मुलाखतीमध्ये तिचा सुपरहिट चित्रपट उमराव जानबद्दल देखील उघडपणे चर्चा केली होती. या चित्रपटासाठी रेखाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटाबद्दल सांगताना रेखा म्हणाली कि मला वाटत नाही कि या चित्रपटामध्ये मी कोणता चमत्कार केला आहे. हा चित्रपट त्या काळामध्ये बनला जो बनायचा होता. मी यासाठी काही खास मेहनत केली नव्हती. तथापि त्या काळामध्ये माझे पर्सनल लाईफ अशा परिस्थितीमधून जात होते जे आपसूकच मोठ्या पडद्यावर आले.

साऊथचा सुपरस्टार आणि रोमांस किंग म्हणून ओळखला जाणारा जेमिनी गणेशन आणि अभिनेत्री पुष्पावल्लीच्या घरी १० ऑक्टोबर १९५० रोजी जन्मलेली रेखाने लहानपणापासूनच ग्लॅमरस लाईफ जगली आहे. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी रेखा अभिनय जगतामध्ये आली होती. तथापि त्यावेळी रेखाला अभिनेत्री बनण्याची आवड नव्हती. कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे रेखाला काम करावे लागले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts