HomeBollywoodसलमान खानच्या अभिनेत्रीचा भीषण अपघात, समोर आले घटनास्थळावरील भयावह फोटो...

सलमान खानच्या अभिनेत्रीचा भीषण अपघात, समोर आले घटनास्थळावरील भयावह फोटो…

जुडवा चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिसलेली प्रसिद्ध अभिनेत्री रंभाबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. कॅनडामध्ये अभिनेत्रीच्या कारचा अपघात झाला आहे. याची माहिती अभिनेत्री स्वतः तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेयर करून दिली आहे.

फोटो शेयर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्येमध्ये लिहिले आहे कि, शाळेमधून मुलांना घेतल्यानंतर आमच्या कारला दुसऱ्या कारने चौरस्त्यावर धडक दिली. मुलांसोबत मी आणि आया देखील होती. आम्ही सर्वजण ठीक आहोत. साधारण दुखापत झाली आहे. माझी लहान साशा अजून हॉस्पिटलमध्ये आहे.

कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. या फोटोंमध्ये रंभाने कार आणि मुलगी साशाची एक झलक दाखवली आहे. जी हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपली आहे. तिच्याजवळ डॉक्टर आहेत. तर इतर फोटोमध्ये तिची कार पाहायला मिळत आहे जी अपघातामध्ये वाईटरित्या डॅमेज झाली आहे.

या फोटोंवर चाहते आणि सेलेब्स अभिनेत्री आणि तिच्या मुलांसाठी लवकरच बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. साउथ अभिनेत्री स्नेहाने लिहिले आहे कि आई काळजी घ्या. प्रेम आणि प्रार्थना. तर श्रीदेवी विजयकुमारने देखील कमेंट केल्या आहेत, तुम्ही सुरक्षित आहात याचा आनंद झाला, काळजी घ्या.

रंभाने बॉलीवूड ते तेलगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तथापि अभिनेत्रीने बॉलीवूड चित्रपटांमध्ये खूपच कमी काम केले. २०१० मध्ये तिने बिझनेसमन इंद्रन पद्मनाथनसोबत लग्न केले. लागणानंतर रंभाने बॉलीवूडला कायमचा निरोप दिला आणि पतीसोबत कॅनडाला शिफ्ट झाली. अभिनेत्री तीन मुलांची आई आहे, दोन मुली आणि एक मुलगा. ती सोशल मीडियावर तिच्या कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by RambhaIndrakumar💕 (@rambhaindran_)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts