दिग्गज अभिनेत्री रजिता कोचरचे २३ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये निधन झाले. त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रजिता कोचरने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले होते. कंगना रनौतच्या मणिकर्णिका चित्रपटामध्ये देखील ती दिसली होती. याशिवाय कहानी घर घर की, हातिम, कवच आणि अनेक शोचा ती भाग राहिली आहे.
किडनी निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांची भाची नुपूर कमपानीने सांगितले कि रजिताला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ब्रेन स्टोक आला होता आणि त्यामुळे त्या अर्धांगवायूच्या शिकार झाल्या होत्या. तथापि त्या हळू हळू ठीक होत होत्या, पण २० डिसेंबर रोजी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला आणि पोटामध्ये वेदना देखील होऊ लागल्या यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण काल २३ डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती खूपच बिघडली. नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र १०.१५ वाजता त्यांचे निधन झाले.
नुपूरने पुढे सांगितले कि रजिता कोचर त्यांच्या आईसारखी होती. त्यांनी म्हंटले कि ती भलेहि माझी बायोलॉजिकल आई नव्हती पण ती आईपेक्षा खूपच जवळची होती. तिने माझ्या सांभाळ केला मला मोठी केले. ती सर्वांवर प्रेम करत होती आणि तिने नेहमीच लोकांमध्ये प्रेम निर्माण केले. त्यांनी कधीच कोणाचे वाईट केले नाही. त्या नेहमी आम्हाला लोकांमध्ये पॉजिटीव्ह गोष्टी पाहण्यास सांगायची.
नुपूरने रंजितासोबत घालवलेले शेवटचे क्षण आठवले. तिने सांगितले कि जेव्हा मी तिला भेटले तेव्हा तिने माझा हात पकडला आणि प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानले. मी तिला म्हंटले कि तुम्हाला माझ्यासाठी जगावे लागेल आणि त्यांनी थम्ब्स अप केले. हे आमचे शेवटचे बोलणे होते. मला वाटते कि त्यांना माहिती झाले होते कि त्यांचा शेवटचा क्षण आला आहे.