टीव्ही अभिनेत्री नेहा मर्दा गेल्या ९ महिन्यांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण आला आहे. अभिनेत्री नुकतेच आई झाली आणि आणि तिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. सध्या आई आणि बाळ दोघांची प्रकृती ठीक आहे आणि दोघे हॉस्पिटलमध्येच आहेत. गुरुवारी नेहा मर्दाला हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. असे म्हंटले जात होते कि तिच्या प्रेग्नंसीमध्ये काही कॉम्पलिकेशन होत्या.
नेहा मर्दाच्या मुलीचा जन्म वेळेच्या अगोदरच झाला आहे. तथापि बाळ प्री-मॅच्युअर असल्याचं सांगितले जात आहे ज्यामुळे त्याला NICUमध्ये ठेवले गेले आहे. तथापि दोघांना हॉस्पीटलमधून अजून डिस्चार्ज दिलेला नाही. नेहा मर्दानुसार सुरुवातीपसूनच तिला बिपीचा इशू होता. खासकरून पाचव्या महिन्यामध्ये तिला खूप त्रास जाणवू लागला होता. तथापि डॉक्टर तिच्या प्रकृतीबद्दल जागरूक होते. एक दिवस अगोदर तिला ब्लडप्रेशरमुळे त्रास झाला होता. पण परिस्थिती नियंत्रणात आली होती.
अभिनेत्री नेहा मर्दा फेब्रुवारी २०१२ मध्ये उद्योगपती आयुष्मान अग्रवालसोबत विवाहबंधनात अडकली होती. पण आई बनण्याचा निर्णय त्यांनी १० वर्षानंतर घेतला. गेल्या वर्षी तिने प्रेग्नंसीची घोषणा केली होती आणि आता ती एका मुलीची आई झाली आहे.
नेहाला बालिका वधू सारख्या हिट सिरीयलमुळे खूपच लोकप्रियता मिळाली होती. आज देखील तिला या सिरीयलमुळेच ओळखले जाते. तथापि लग्नानंतर ती पूर्णपणे अभिनयापासून दूर गेली होती पण सोशल मिडियावर ती नेहमी सक्रीय राहत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या बेबी शॉवरचा फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
View this post on Instagram