HomeBollywoodप्रसिद्ध अभिनेत्रीने केले बॉलीवूडबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाली; रोज आठ आठ तास माझ्या...

प्रसिद्ध अभिनेत्रीने केले बॉलीवूडबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाली; रोज आठ आठ तास माझ्या…

अभिनेत्री नरगीस फाखरी बॉलीवूड वर खूपच नाराज आहे. अभिनेत्रीचे म्हणणे आहे की बॉलीवूड मधून तिला निराशा मिळाली. इम्तियाज अली चा चित्रपट ‘रॉकस्टार ‘ मध्ये नरगीस फाखरी, रणबीर कपूर सोबत दिसली होती. त्यासोबतच ती ‘मद्रास कॅफे’, ‘मै तेरा हिरो’, ‘अजहर’,आणि हाउसफुल ३’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. एका मुलाखतीत नरगीस फाखरी ने सांगितले की तिला मूर्ख म्हणले जात असे. कारण की ती प्रत्येका सोबत सुसंगत होत नसे. अभिनेत्रीने सांगितले की या अनुभवामुळे कंटाळली आहे आणि तिला या प्रसिद्धी आणि स्तुती ची सवय देखील नाही.

नरगीस म्हणाली, “मला माहिती नव्हती की त्या नवीन वातावरणात कसे स्वतः ला वाचवले पाहिजे. मी माझ्या भावनांना घेऊन खूपच प्रामाणिक होते. मला सांगितले जात होते की भलेही मी कोणासोबत सहज मिसळत नाही, परंतु मला त्यांच्या सोबत बोलावे लागेल. जे माझ्या कडून होत नव्हते. त्यामुळे मला अपरिपक्व समजले जात असे. आज मला समजले की वास्तविक पाहता तीन चेहरे असतात – एक व्यावसायिक चेहरा, एक सृजनशील चेहरा आणि नंतर तुमचा वैयक्तिक चेहरा.

अभिनेत्रीने पुढे सांगितले, “मी आठ वर्षां पर्यंत दररोज आठ तास काम केले आहे आणि मला खूप कमी संधी मिळाली की माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची. मी स्वतः ला तणावग्रस्थ समजत होते. मला खूप आरोग्याच्या समस्या सुरु झाल्या. कदाचित ते डिप्रेशन होते. मी माझ्या परिस्थितीवर नाखूष होते आणि स्वतः ला प्रश्न करत होते की मी अजूनही इंडस्ट्री मध्ये का आहे.” अभिनेत्रीने सांगितले की तिची तब्बेत ठीक होण्यास २ वर्षांचा कालावधी लागला होता.

तिच्या बॉलीवूड मधील कामाव्यतिरिक्त, नरगीस हॉलीवूड मधील हिट चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने ‘स्पाई’ मध्ये देखील काम केले आहे, ज्यामध्ये मेलिसा मैकार्थी, जेसन स्तेथम आणि जुड लॉ यांनी देखील काम केले आहे. तिला पवन कल्याण च्या ‘हरी हर वीरा मल्लू’ मध्ये कास्ट केले गेले आहे.

नरगीस फाखरी आधी अभिनय क्षेत्रात नव्हती. तिला बॉलीवूड पासून तक्रार होती. याआधी देखील खूप अभिनेत्रींनी इंडस्ट्री बद्दल आपले दुखः व्यक्त केले आहे. अभिनेत्री नीना गुप्ता ने सांगितले होते की तिच्या सोबत कोणीही काम करण्यास तयार नाही. तथापि ती अलीकडे ओटीटी वर दिसत आहे, परंतु तिचे असे म्हणणे आहे की खूप सारे अभिनेते तिच्या सोबत काम करण्यास नकार देतात. बॉलीवूड मध्ये भेदभाव करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts