HomeBollywoodसिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाचे फोटो आले समोर, पहा फोटोज...

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाचे फोटो आले समोर, पहा फोटोज…

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आला आहे. बॉलीवूडचे हे क्युट कपल विवाहबंधनात अडकले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेस हॉटेलमध्ये सात फेरे घेतले आहेत. स्वकीयांच्या उपस्थितीमध्ये कियारा आणि सिद्धार्थ विवाह बंधनात अडकले.

नवदाम्पत्यांबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री कियाराने पिंक कलरचा जरीचा गाऊन घातला आहे ज्यावर सिल्वर वर्क केले आहे. तर सिद्धार्थने ऑफ क्रीम कलरची शेरवानी घातली आहे ज्यावर इम्रॉयडर वर्क केलेले आहे. तर लग्नामध्ये मुलाकडील पाहुण्यांनी पिंक कलरची पगडी घातली होती तर मुलीकडील पाहुण्यांनी गोल्डन कलरची पगडी घातली होती.

हळदीच्या विधीनंतर लविंग कपल कियारा आणि सिद्धार्थ जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसच्या बावडीमध्ये शाही अंदाजामध्ये सात फेरे घेऊन कायमचे एक झाले. लग्नानंतर आता रिसेप्शन देखील भव्य असणार आहे. कियाराला सिद्धार्थ मल्होत्राची नवरी म्हणून चाहते खूपच पसंद करत आहेत.

सिद्धार्थ कियाराच्या लग्नापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी मेहेंदी आणि संगीतचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. संगीत नाईटसाठी सूर्यगड पॅलेस गुलाबी रंगामध्ये सजवण्यात आले होते. गुलाबी रंगामध्ये सूर्यगड पॅलेसचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. महालाचे फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता कि कियारा आणि सिद्धार्थ आणि कियाराचे वेडिंग किती भव्य होते.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नामध्ये कुटुंबियांसोबत बॉलीवूडमधील अनेक नामी सेलेब्रेटी देखील उपस्थित होते. सिड-कियाराच्या लग्नामध्ये मनीष मल्होत्रा, करण जोहर, शाहिद कपूर, मीरा राजपूतसोबत अंबानी कुटुंब देखील सामील झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts