HomeEntertainment२५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची झालीय इतकी दयनीय अवस्था,...

२५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची झालीय इतकी दयनीय अवस्था, उपचारासाठी देखील नाहीत पैसे…

नुकतेच टीव्ही सिरीयलमध्ये काम केलेल्या अभिनेत्री निशी सिंहचे निधन झाले आहे. ती बऱ्याच दिवसांपासून आर्थिक समस्यांशी झुंज देत होती आणि तिच्याजवळ इलाजासाठी देखील पैसे नव्हते. आता आणखीन एक बातमी समोर आली आहे. ७२ वर्षाची साउथ अभिनेत्री जयाकुमारी देखील या स्थितीमधून जात आहे.

जयाकुमारीच्या दोन्ही किडन्या खराब आहेत आणि तिच्याजवळ इलाजासाठी पैसे नाहीत. अभिनेत्री सध्या सरकारी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे. तिने लोकांना आर्थिक मदतीसाठी देखील आवाहन केले आहे. जयाकुमारीने तिच्या करियरमध्ये ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती ६० ते ७० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री होती.

७२ वर्षाची अभिनेत्रीचा इलाज चेन्नईच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये सुरु आहे. पैशांच्या तंगीमुळे ती मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन शकत नाही आहे. जयाकुमारीचा हॉस्पिटलमध्ये पलंगावर बसलेला एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तिने मदतीसाठी सरकार आणि साउथ इंडस्ट्रीसंबंधी कलाकारांना देखील आवाहन केले आहे. असे म्हंटले जात आहे कि तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमनियन तिच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

माहितीनुसार जयाकुमारीचे पति नागपट्टिनम अब्दुल्लाह यांचे निधन खूपच आधी झाले आहे. दोघांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. जयाकुमारी तिच्या मुलासोबत राहते. असे म्हंटले जात आहे कि आपल्या आईची प्रकृती पाहण्यासाठी तिन्ही मुलांपैकी कोणीही हॉस्पिटलमध्ये आले नाही.

साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये जयाकुमारी प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक राहिली आहे. तिने फक्त १६ व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. १९६६ मध्ये तिने नाडोदी चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. असे म्हंटले जाते कि जयाकुमारी तिच्या कॅरेक्टमध्ये घुसत होती आणि शानदार अदाकारीचा नमुना सादर करत होती. तिने कलेक्टर मालती, मिन्निना मागा, हरमना, नुतरुक्कू नुरू, अनाथै आनंदन, फुटबॉल चँपियन सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts