HomeBollywoodफोटोमध्ये दिसत असलेली गोंडस मुलगी राहिली आहे अमिताभ, धर्मेंद्र पासून अनेक स्टार्सची...

फोटोमध्ये दिसत असलेली गोंडस मुलगी राहिली आहे अमिताभ, धर्मेंद्र पासून अनेक स्टार्सची हिरोईन, नंतर बनली खासदार…

फोटो मध्ये दिसणारी खूपच गोंडस मुलगी एकेकाळी चाहत्यांच्या मनावर राज्य करत होती. हि मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी आहे. पुढे ती खासदार देखील झाली. त्या मुलीने तिच्या काळात जवळपास सर्व मोठ्या कालाकांच्या सोबत प्रमुख अभिनेत्री म्हणून चित्रपटांमध्ये काम केले आहे. बालपणी तिने नृत्यांगना म्हणून खूप नाव कमावले.

तिची सुंदरता आणि नृत्य कौशल्य पाहून तिच्याकडे चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या. १४ वर्षाच्या वयामध्ये तिने चित्रपटामध्ये सुरुवात केली होती. साउथ च्या चित्रपटांमध्ये नाव कमवाल्यानंतर तिने बॉलीवूड कडे वाटचाल केली आणि तिला खूप प्रसिद्धीही मिळाली.

फोटो मध्ये दिसत असलेल्या या मुलीला अजून देखील तुम्ही ओळखला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो कि हा फोटो अभिनेत्री जया प्रदा यांचा लहानपणीचा आहे. जया त्यांच्या काळामध्ये खूप सुंदर आणि ग्लेमरस अभिनेत्रींमध्ये सामील होत्या. त्यांनी त्यांच्या काळात अनेक मोठ्या स्टार्स सोबत जोडी बनवली आणि अनेक हिट चित्रपट दिले.

तिच्या सौंदर्य आणि शैली मुळे तिचे लाखो चाहते होते. तथापि नंतर तिने इंडस्ट्री सोडली आणि राजकारणामध्ये दिसू लागली. परंतु आज देखील त्यांचे चाहते कमी झालेले नाहीत. त्या आजही खूप सुंदर दिसतात. अलीकडे जया प्रदा चे नवीन फोटो सोशल मिडीयावर वायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

जयाप्रदा चा जन्म ललिता राणी च्या नावाने भारतातील आंध्रप्रदेश राज्यातील राजमंड्री तील एका सामान्य कुटुंबात झाला होता. तिचे वडील कृष्णा एक तेलुगु चित्रपट फायनान्स पहात होते. तिची आई निलवाणी ने तिला कमी वयामध्ये नृत्य आणि संगीत वर्गामध्ये दाखल केले होते. जेव्हा ती चौदा वर्षांची होती, तेव्हा तिने तिच्या शाळेच्या वार्षिक समारंभामध्ये नृत्य केले होते. प्रेक्षकांमध्ये एक चित्रपट दिग्दर्शकाचा समावेश होता आणि त्याने जयाप्रदा यांना तेलुगु चित्रपट ‘भूमीकोसम’ मध्ये तीन मिनिटांचे नृत्य सादर करण्यास सांगितले. जयाप्रदा यांनी संकोच केला, परंतु तिच्या कुटुंबीयांनी तिला प्रस्ताव स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. तिला चित्रपटामध्ये काम करण्यासाठी फक्त १० रुपये देण्यात आले, परंतु तिला त्यानंतर अनेक ऑफर्स येत गेल्या. नंतर ती हिंदी चित्रपटांमध्ये देखील दिसू लागल्या.

जया प्रदा ने अनेक हिट चित्रपट केले आहेत, ज्यामध्ये ‘सरगम’, ‘मां’, ‘घर घर कि कहाणी’, ‘तुफान’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘संजोग’, ‘मुद्दत’, ‘सिंदूर’, ‘जबरदस्त’, ‘जख्मी’, ‘गंगा तेरे देश में’, ‘कामचोर’, ‘आवाज’, ‘पाताल भैरवी’, ‘सपनों का मंदिर’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by saru (@edusaru3355)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts