HomeBollywoodमासिक पा*ळी मधील वेदने सोबतच सामान्य महिलांप्रमाणे ‘या’ अभिनेत्रींना सहन करावा लागला...

मासिक पा*ळी मधील वेदने सोबतच सामान्य महिलांप्रमाणे ‘या’ अभिनेत्रींना सहन करावा लागला भेदभाव…

बॉलीवूड अभिनेत्री आपल्या बद्दल बोलण्यात अजिबात संकोच करत नाही, मग जरी गोष्ट अभिनेत्यासोबत बरोबरीची असो की, मानधनाबद्दल असो वा पिरियडची, आज पण समाजामध्ये मासिक पाळी वरून खूप वेगवेगळी मते आहेत. अभिनेत्री आपल्या मुलाखतीत त्याबद्दल खुलेआम बोलल्या आहेत.सोनम कपूर पासून करीना कपूर, तापसी पन्नू पर्यंत आपल्या काही मुलाखतीत सांगितले आहे की पिरियड्स च्या दरम्यान त्यांना वेदने सोबत काय काय सहन करावे लागले.

सोनम कपूर ने एका मुलाखतीत मासिक पाळी दरम्यान तिच्या सोबत घरात कशा प्रकारची वागणूक दिली जाते, त्याच्या विषयी सांगत होती. त्यांनी सांगितले की त्यांची आजी मासिक पाळी दरम्यान त्यांना स्वयंपाक घरात मंदिरात जाण्यास मनाई करत असे. एवढेच नाही तर त्यांना लोणच्याला पण हात लावण्यास परवानगी नसे.

तापसी पन्नू चे सांगणे आहे की मासिक पाळी मध्ये मुलींना वेदना सहन करण्याची ताकत देतात आणि त्या कारणामुळे मुली मुलांपेक्षा जास्त ताकतवर असतात. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की मासिक पाळी मध्ये हृदयविकाराच्या झटक्या प्रमाणे वेदना होतात.त्यांनी हे पण सांगितले की शूटिंग च्या वेळी मासिक पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी औषधांची मदत घ्यावी लागते.

करीना कपूर ने मासिक पा*ळी वेळी काय हाल होतात त्यांचे याबद्दल खूप वेळा सांगितले आहे. त्यांनी आपला अनुभव सांगितला की त्यावेळी त्यांना खूप वेदनेचा सामना करावा लागला आणि त्यांची भावना सुद्धा बदलत रहाते. करीना ने हे सुद्धा सांगितले की मासिक पाळी च्या वेळी शुटिंग पण करू शकत नाही.

यावेळी गर्भावस्थेचा आनंद घेत असलेली आलिया भट्ट पण मासिक पाळीवर भाष्य केले आहे. त्यांनी एकदा सांगितले होते, महिलांच्यात होणारी ही सामान्य गोष्ट आहे. मला ही गोष्ट समजत नाही की एक स्त्री एका नवीन जीवाला जन्म देते त्याला अशुद्ध का मानले जाते. का स्त्रियांना मासिक पाळी मध्ये मंदिरात जावू देत नाही. मासिक पाळी असणे एक अभिमानाची गोष्ट आहे.

आपल्या तिखट वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी स्वरा भास्कर पण मासिक पाळीवर आपले मत मांडले आहे. मासिक पाळी शाळा चुकवणे खेळणे बंद करणे घरी बसण्याचे कारण नाही. हा काही गुन्हा नाही आणि यावर खुली चर्चा पण केली जाऊ शकते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts