HomeBollywoodघट्ट पँट घातल्यामुळे चक्क पोलिसांनी पकडून नेले होते 'या' अभिनेत्रीला, नंतर झाले...

घट्ट पँट घातल्यामुळे चक्क पोलिसांनी पकडून नेले होते ‘या’ अभिनेत्रीला, नंतर झाले असे काही कि जाणून तुम्हाला धक्का बसेल…

इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिजाब वाद सुरु आहे. ईरानच्या पोलिसांनी २२ वर्षाची मुलगी महसा अमिनीला हिजाब व्यवस्थित न घातल्यामुळे अटक केली होती. पोलीस कस्टडीमध्ये मुलीचा मृत्यू झाल्यामुले इराणमधील महिला संतप्त झाल्या असून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या प्रकरणामध्ये आता इराणमध्ये राहणारी बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी हिने इराणचा पर्दाफाश केला आहे.

अभिनेत्री एलनाज नौरोजीचे संपूर्ण कुटुंब इराणमध्ये राहते. पण आता इराणमध्ये होत असलेल्या वादामुळे अभिनेत्री आपल्या कुटुंबाला संपर्क करू शकत नाही आहे. अभिनेत्री आपल्या कुटुंबासाठी खूपच काळजीमध्ये आहे. अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने इराणची पोलखोल केली आहे. अभिनेत्रीने सांगितले कि इराण किती वाईटरित्या लोकांवर अत्याचार करत आहे.

इराणची राहणारी एलनाज नौरोजीने देखील तिथल्या पोलिसांचा अत्याचार सहन केला आहे. एलनाज जेव्हा इराणमध्ये राहत होती तेव्हा ती पोलिसांच्या तावडीमध्ये सापडण्यापासून वाचली होती. अभिनेत्रीने आपल्या या भयानक अनुभवाबद्दल सांगितले, महासा अमिनीसोबत जे झाले ते माझ्यासोबत देखील झाले असते. काही वर्षांपूर्वी इराणमध्ये होते. तेहरानमध्ये माझा शेवटचा दिवस होता. मी माझ्या कजिन ब्रदरसोबत बाहेर होते. तेव्हा अचानक एक महिला माझ्यासोमोर येऊन मला विचारू लागली कि हे काय आहे ? मला समजले नाही कि ती कशाबद्दल विचारत आहे. तिने पुन्हा विचारले हे काय आहे ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Elnaaz Norouzi (@iamelnaaz)

अभिनेत्री पुढे म्हणाली कि मॉरल पोलिस पेट्रोल-ए-इर्शादने मला यासाठी पकडले होते कारण माझी पँट घट्ट होती. त्यामुळे माझे घोटे दिसत होते. फक्त यामुळेच मला व्हॅनमध्ये बसून री-एजुकेशन सेंटरमध्ये नेण्यात आले. हि तीच जागा होती जिथे महसा अमिनीला नेण्यात आले होते. मला तोपर्यंत तिथे ठेवण्यात आले जोपर्यंत कोणी माझ्यासाठी ढिल्ले कपडे घेऊन आले नाही.

अभिनेत्रीने इराणच पोलखोल करत पुढे सांगितले कि जेव्हा मी तिथे पोहोचली तेव्हा त्यांनी माझा फोन आणि पासपोर्ट दोन्ही घेतले होते. ते लोक ज्याप्रकारे घाबरवतात आणि जी वागणूक देतात या सर्व गोष्टींसोबत इराणमध्ये कोणी राहू शकत नाही. कारण ते लोक विचित्र गोष्टींसाठी लोकांना पकडून नेतात. ते महिलांचं नेल कलर, कपडे, हिजाब कोणत्याही गोष्टीसाठी पकडून घेऊन जातात.

अभिनेत्री म्हणाली कि कोणी महिला अशा पाकाराची वागणूक डिजर्व करत नाही. हि स्टोरी मी यासाठी सांगत आहे कान जे काही २२ वर्षाची महसा अमिनीसोबत झाले आहे ते माझ्यासोबत देखील झाले असते. हि गोष्ट इराणच्या कोणत्याही महिलेसोबत होऊ शकते. हे खूपच खतरनाक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Elnaaz Norouzi (@iamelnaaz)

अभिनेत्री पुढे म्हणाली कि ते महिलांचे फोटो आणि डिटेल्स घेऊन जातात. कोणाला माहिती नसते कि कधी ते कोणाला कोणत्या गोष्टीसाठी पकडून घेऊन जातात. ज्या महिलांना आणि मुलींन ते पकडून नेतात अनेकवेळा त्या परत येत नाहीत. एलनाज नौरोजीने आपल्या व्हिडीओमध्ये इराणी पोलिसांची पूर्ण पोलखोल केली आहे. इराणमध्ये ज्याप्रकारे महिलांसोबत वाईट वागणूक केली जाते. ते जाणून घेतल्यानंतर कोणाचेही हृदय हेलावून जाईल. आपल्या व्हिडीओ द्वारे अभिनेत्रीने जगाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे कि इराणच्या महिलांची हालत चांगली नाही, लोकांनी एकत्र येऊन महिलांची मदत केली पाहिजे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts