बॉलीवूड अभिनेत्री एली अवराम तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ऐले अवोर्डस २०२२ च्या दरम्यान एली अवराम चे नाव खूपच चर्चेत आले होते. या अवोर्ड कार्यक्रमादरम्यान एली अवराम ने एक असा विचित्र ड्रेस घातला होता, ज्याच्या मुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल चा सामना करावा लागला. एवढेच नाही तर युजर्स एली ची तुलना सोशल मिडिया स्टार उर्फी जावेद सोबत करत आहेत.
ऐले अवोर्डर्स २०२२ च्या रात्री अनेक प्रसिद्ध चित्रपट कलाकाराचा गोतावळा जमा झाला होता. अशातच एली अवराम देखील या खास अवोर्डस समारंभाचा भाग बनण्यासाठी पोहोचली. त्यावेळी मानव मंगलानी ने त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंट वर एक नवीन विडीओ शेअर केला आहे. या विडीओ मध्ये एली अवराम रेड कार्पेट वर येताना दिसत आहे.
या विडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एली अवराम ने जो ड्रेस घातला आहे. तो थोडा वेगळा आणि विचित्र वाटत आहे. नेटीजंस ने एली च्या या ड्रेस ला पासून तिची तुलना उर्फी जावेद सोबत करायला सुरुवात केली आणि तिला खूप ट्रोल करायला सुरुवात केली.
सोशल मिडीयावर ट्रोलर्स च्या निशाण्यावर आलेली एली अवराम च्या बद्दल युजर्स लिहित आहेत की ‘या ड्रेस ची डिझाईनर उर्फी च असू शकते’. अन्य एका युजर ने लिहिले की, ‘तुम्हाला असा ड्रेस घालताना लाज वाटत नाही’. त्याव्यतिरिक्त एका युजर चे म्हणणे आहे की, ‘फैशन च्या नावावर एक धब्बा आहे एली अवराम चा हा ड्रेस’. अशाप्रकारे अनेक लोक एली च्या या ड्रेस ला पाहून आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
खूप दिवसांपासून चित्रपटाच्या जगतापासून दूर राहिलेली एली अवराम ने अलीकडेच पदार्पण केले आहे. परंतु एली परतली ती बॉलीवूड मध्ये नाही तर साउथ च्या चित्रपटांमध्ये आली आहे. प्रत्यक्षात साउथ सुपरस्टार धनुष च्या सोबत एली अवराम चित्रपट ‘वाथी’ मध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये एली अवराम चा कमालीचा अभिनय पाहून तिची खूपच प्रशंसा होताना दिसत आहे.
View this post on Instagram