HomeEntertainmentप्रसिद्ध अभिनेत्रीवर आली इतकी वाईट वेळ, अॅक्टिंगची ऑफर मिळत नसल्यामुळे रोजच्या गरजा...

प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली इतकी वाईट वेळ, अॅक्टिंगची ऑफर मिळत नसल्यामुळे रोजच्या गरजा भागवण्यासाठी करत आहे ‘असले’ काम…

टीवी अभिनेत्री एकता शर्मा चे दिवस काही ठीक चालले नाहीत. ती ‘क्यो की सास भी कभी बहु थी’, ‘कुसुम’, ‘कामिनी दामिनी’ आणि ‘बेपनाह प्यार’ सारख्या हिट मालिकांमध्ये काम केलेल्या आहेत. असे असूनदेखील आज तिला एका कॉल सेंटर मध्ये काम करून आपले घर चालवावे लागत आहे. मुलाखती दरम्यान बोलताना अभिनय क्षेत्रात काम न मिळण्याबाबत एकता चे दु:ख समोर आले. कोरोना महामारी च्या वेळी एकता ला जवळ जवळ एक वर्ष बेरोजगार बसावे लागले.

एकता शर्मा शेवटच्या एकता कपूर च्या टीवी मालिका ‘बेपानाह प्यार’ मध्ये दिसली होती. ती मलिक २०२० मध्ये समाप्त झाली आणि तेव्हाच कोरोना महामारी ची सुरुवात झाली.त्यानंतर एकता ला काम मिळाले नाही आणि तिच्या वाईट दिवसांची सुरुवात झाली. मुलाखतीत एकता ने सांगितले की, “मी अभिनय क्षेत्रातील कामासाठी खूप संघर्ष केला आहे. मी घरात बसून अभिनयाची संधी मिळायची वाट नाही बघू शकत. त्यामुळे मी मागील वर्षी एक बिपिओ मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

एकता ने हे सुद्धा सांगितले की, “मला माझ्या कामाबद्दल प्रेम आहे आणि लवकरच अभिनयात पुनरागमन करू इच्छिते. मी वारंवार ऑडिशन आणि लुक टेस्ट देत आहे.मी आशा करते की लवकरच मला काही चागले काम मिळेल”. एकता फक्त व्यावसायिक जीवनातच नाही तर वैयक्तिक जीवनात देखील खूप संघर्ष करत आहे. ती तिच्या ८ वर्षाच्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात खटला लढत आहे. तिने सांगितले की एका वेळी तिच्या जीवनात खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत. आता ती आपल्या आई सोबत एका भाड्याच्या घरात रहात आहे आणि तिला आशा आहे की परिस्थिती लवकरच सुधारेल.

एकता ने तिच्या करिअर ची सुरुवात २००० मध्ये ‘डैडी समजा करो’ पासून केली होती. तिने सांगितले, “कॉल सेंटर मध्ये काम करण्यास काही वाईट नाही, कोणतेही काम लहान अथवा मोठे नसते जेव्हा पर्यंत की तो आपला विवेक सोडून देत नाहीत”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ekta Sharma (@ektasd)

एकता ने हे देखील सांगितले की जवळ जवळ दोन दशकापासून टीवी इंडस्ट्री मध्ये सक्रीय राहून देखील तिला काम मिळत नाही ही खूपच दुखद गोष्ट आहे. तिने सांगितले की, “मी माझ्या स्वर्गीय वडिलांना धन्यवाद करू इच्छिते, त्यांनी मला अभिनयात करिअर करण्या अगोदर मला माझी पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. त्यांच्या सल्ल्यामुळेच आज मी पैसे कमवू शकत आहे आणि माझा सांभाळ करू शकत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts