‘मंगल भवन अमंगल हारी’ जेव्हा देखील हा आवाज टीव्हीवर येत होता तेव्हा संपूर्ण घरामध्ये एकच शांतता व्हायची. रामायण पाहण्यासाठी हा एक अलार्म होता. सर्व गल्ली-बोळ यावेळी सामसूम असायचे कारण सर्वजण त्यावेळी टीव्हीसमोर येऊन बसायचे. लोकांवर प्रभू श्री रामाचा रंग इतका चढला होता कि आज देखील रामानंद सागरच्या त्या भूमिकांना लोक देवासारखे पूजतात. यामध्ये मत सीतेची भूमिका करणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया देखील खूपच लोकप्रिय आहे.
रामानंद सागर कृत रामायण जेव्हा पुन्हा टीव्हीवर टेलिकास्ट झाला तेव्हा त्याने सर्व शोवर मत देत सर्वात जास्त पाहिला गेलेल्या शोचा रेकॉर्ड बनवला. अरुण गोविल जिथे स्क्रीनवर राम बनले तर मत सीताच्या भूमिकेमध्ये दीपिका चिखलिया पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा अभिनेत्री दीपिका चिखलिया माता सीतेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली आहे. दीपिकाने भगव्या साडीमध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे.
हा व्हिडीओ खूपच खास आहे. तुम्हाला माहिती असेल कि मत सीता प्रभू रामसोबत १४ वर्षासाठी वनवासाला जाते तेव्हा माता अनुसुइया तिला असे वस्र्स देते जे कधीच खराब होत नाहीत. माताची भगवी साडी तर तुम्हाला माहितीच असेल ज्यामध्ये ती १४ वर्षाचा वनवास पूर्ण करते. ठीक तशीच साडी अभिनेत्रीने पुन्हा एकदा घातली आहे.
दीपिका चिखलियाला भगव्या साडीमध्ये पाहून युजर्स म्हणाले आहे कि आज नवरात्री दरम्यान माता सीताचे दर्शन पुन्हा एकदा झाले. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि सकाळी सकाळी माता सीताचे दर्शन झाले. तर आणखी एका युजरने लिहिले आहे कि मॅडम तुमच्यासारखे कोणी नाही. हि सर्व माता सीताच्या भूमिकेची जादू आहे कि जा देखील दीपिका चिखलियाला इतके प्रेम मिळत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram