चक दे इंडिया चित्रपटामध्ये कोमल चौटालाच्या भुमिकेमधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री चित्राशी रावत विवाह बंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड ध्रुवादित्य भगनानीसोबत लगीनगाठ बांधली. शनिवारी दोघे विवाह बंधनात अडकले. चित्राशीच्या लग्नामध्ये सामील होण्यासाठी चक दे इंडियामधील को-स्टार्स देखील पोहोचले होते.
अभिनेत्री विद्या मालवाडेने चित्रांशीच्या लग्नाचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. दुसरीकडे ध्रुवादित्यने आपल्या लग्नाच्या बिग डेसाठी शेरवानीची निवड केली होती. वधूवरच्या जोडीमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.
वेडिंग फोटोजमध्ये चित्राशी आणि ध्रुवादित्य तुम्ही मित्र, कुटुंब आणि स्वकीयांमध्ये आनंदाचे क्षण सेलेब्रेट करताना पाहू शकता. कपलचे वेडिंग फोटोज सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सोशल मिडिया युजर्स फोटोजवर कमेंट करून नवविवाहित कपलला शुभेच्छा देत आहेत.
दोघांचे लग्न बिलासपुरमध्ये झाले. फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता कि ध्रुवादित्य चित्रांशीच्या माथ्यावर कीस करताना दिसत आहे. चित्राशी आणि ध्रुवादित्य जवळ जवळ ११ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आता शेवटी दोघांनी लग्न केले आहे.
दोघांनी आपल्या कुटुंबियांच्या आणि स्वकीयांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. ज्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री चित्राशीने चक दे इंडिया आणि लक सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. चक दे इंडिया चित्रपटामधील तिची कोमल चौटालाची भूमिका खूपच फेमस झाली होती.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram