HomeBollywoodफोटोमधील हि चिमुरडी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, फक्त बॉलीवूडच नाही तर साऊथमध्ये देखील...

फोटोमधील हि चिमुरडी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, फक्त बॉलीवूडच नाही तर साऊथमध्ये देखील आहे तिचा दबदबा…

सोशल मिडियावर सध्या अनेक बॉलीवूड कलाकारांचे बालपणीचे फोटो व्हायरल होत आहेत. काही कलाकारांना बालपणीच्या फोटोमध्ये ओळखणे खूपच सोपे असते कारण त्यांच्या बालपणामध्ये त्यांच्या तरुणपणाची झलक पाहायला मिळते. पण काही कलाकारांचे फोटो अनेकवेळा पाहून देखील आपण त्यांना ओळखू शकत नाही. असाच एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जो एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा आहे.

हा जो फोटो तुम्ही पाहत आहात ज्यामध्ये एक चिमुरडी पाहायला मिळत आहे ती पहिल्याच बॉलीवूड चित्रपटामधून फेमस झाली होती. या चित्रपटाने नाव तुम्हाला पुढे समजेलच. पण तोपर्यंत आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. या चित्रपटामध्ये ती आमिर खानसोबत दिसली होती आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील तिचा प्रचंड दबदबा आहे.

जर तुम्ही अजूनदेखील ओळखू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो या अभिनेत्रीचे नाव काय आहे. हि अभिनेत्री बॉलीवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री असीन आहे. असीनने २००८ मध्ये गजिनी चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यामध्ये आमिर खानसोबत दिसली होती. तथापि याआधी ती साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. पण तिला खरी ओळख गजिनी चित्रपटामधून मिळाली.

गजिनीनंतर असीनने कधीच मागे वळून पाहिले नाही, त्यानंतर ती सलमान खानच्या रेडी चित्रपटामध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. यानंतर ती बोल बच्चन, हाऊसफुल २ आणि खिलाडी ७८६ मध्ये काम करताना दिसली होती.

असीन २०१६ नंतर बॉलीवूडमध्ये सक्रीय नाही. वास्तविक असीनने जानेवारी २०१६ मध्ये मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांच्याशी लग्न केले. आणि लग्न झाल्यानंतर ती तिच्या कौटुंबिक जीवनात खूप व्यस्त झाली आणि नंतर तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले, तरीही असिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज ती तिचे अपडेट्स देत असते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts