HomeEntertainment‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन...

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन…

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडेचा मानलेला भाऊ मंगेशचे दुखद निधन झाले आहे. भावाच्या निधनानंतर अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले आहेत. सोशल मिडियावर तिने भावूक पोस्ट शेयर करत याची माहिती दिली.

इतकेच नाही तर तिने इन्स्टाग्रामवर तिच्या भावाचा एक फोटो देखील शेयर केला आहे. फोटो शेयर करताना तिने कॅप्शन मध्ये भावूक होत आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘एखादा माणूस आपला असतो म्हणजे नेमकं काय? त्याच्या चांगल्या गोष्टी सोबतच वाईट गोष्टी स्वीकारणे म्हणजे असतो का आपला माणूस? प्रत्येक माणूस हा स्वतःचा असा प्रवास करत असतो. येणारे अनुभव आणि भेटणारी माणसं यावर त्याचा प्रवास ठरतो, ध्येय ठरते.’

अभिनेत्री पुढे म्हणते, ‘ मंगेशची “दिदू” झाले पण कदाचित त्याला हवा असणारा वेळ देवू शकले नाही. बहीण म्हणून कमी पडलेच. आपला माणूस म्हणून त्याच्या चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पण वाईट गोष्टींसहित स्विकारता आलेच नाही कदाचित’ ‘माणूस निघून गेला की समजते की गेला तो माझा होता, त्याच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली, त्याला महत्व होते, मला अजून थोडा वेळ हवा होता, मी घेतले असते समजून…पण वेळ पुढे सरकलेला असतो.’

‘मंगेश.. आम्हाला थोडा वेळ दिला असता तर कदाचित आम्ही दोघांनी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. मनावरचे ओझे जगू देईल का आम्हाला.. भावपूर्ण श्रद्धांजली…’ अशी पोस्ट शेयर करून अभिनेत्रीच्या आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts