भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे कायमच चर्चेत आलेली असते. आम्रपाली इंडस्ट्री मधील जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या करिअर मध्ये आम्रपाली ने अनेक सुपरहिट भोजपुरी चित्रपट केले आहेत. तिचे चाहते फक्त भोजपुरी इंडस्ट्रीतच नाही तर सगळी कडे आहेत. चाहते देखील तिच्या बद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्यासाठी आतुर असतात. अशातच तिचा एक नवीन फोटो सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहे, जे चाहत्यांना धक्का देत आहे. त्या फोटोंमध्ये आम्रपाली गरोदर दिसत आहे.
आम्रपाली ने तिच्या इंस्टाग्राम अकौंट वर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याफोटोमध्ये ती बेबी बंप दाखवताना दिसत आहे. फोटो मध्ये तुम्ही पाहू शकता कि आम्रपाली ने काळ्या रंगाचा प्रिंटेड सलवार सुट घातला आहे आणि तिच्या पैंट वर हात ठेवून पोज देताना दिसत आहे.
त्यासोबतच तिच्या भांगात कुंकू आणि हातामध्ये लाल रंगाच्या बांगड्या घातलेल्या दिसत आहे. त्यादरम्यान तिचे चेहऱ्याचे हावभाव पाहून चाहते खूपच चिंतेत आहेत. या फोटोमुळे इंटरनेट वर खूपच गोंधळ घातला आहे. प्रत्येकाच्या मनात या फोटोबद्दल चे सत्य जाणून घ्यायचे आहे. चलातर जाणून घेऊया या फोटो मागचे सत्य.
वास्तविक, आम्रपाली दुबे चा हा फोटो तिचा येणारा चित्रपट ‘दाग एगो लांच्छन’ मधील आहे. या चित्रपटामध्ये आम्रपाली प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट रेणू विजय फिल्म्स इंटरटेन्मेंट च्या अंतर्गत बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माता निशांत उज्वल आणि दिग्दर्शक प्रेमांशु सिंह आहेत. हा आम्रपाली चा या वर्षी प्रदर्शित होणारा सर्वात मोठा चित्रपट आहे. ज्याबद्दल ती स्वतः देखील खूप उत्साही आहे.
आम्रपाली दुबे ने इंस्टाग्राम अकौंट वर या फोटो ला शेअर करताना कैप्शन मध्ये लिहिले आहे कि, ‘माझ्या येणाऱ्या चित्रपटाचा लुक…दाग एगो लांच्छन’. या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. आम्रपाली दुबे च्या या चित्रपटामध्ये रितेश पांडे, विक्रांत सिंह राजपूत, रक्षा गुप्ता, अमित शुक्ला, रंभा सहनी, निशा तिवारी, बबलू पंडित, सत्य प्रकाश आणि ज्योती कलश देखील दिसणार आहेत. चित्रपटाचे सह निर्माता डॉक्टर संदीप उज्वल,सुशांत उज्वल. गीतकार ओम झा आहेत.
View this post on Instagram