HomeBollywoodजाडी असल्यामुळे लोक मारत होते टोमणे, प्रसिद्ध अभिनेत्रीने नैराश्याने सोडली फिल्म इंडस्ट्री,...

जाडी असल्यामुळे लोक मारत होते टोमणे, प्रसिद्ध अभिनेत्रीने नैराश्याने सोडली फिल्म इंडस्ट्री, पहा आता झाली आहे इतकी बो’ल्ड आणि सुपरहॉ’ट…

टीव्ही इंडस्ट्रीचे अनेक कलाकार आहे जे सोशल मिडियावर देखील खूपच लोकप्रिय आहेत. आशिका भाटीया यामधीलच एक आहे. आशिकाचे इंस्टाग्रामवर ५.८ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अभिनेत्रीच्या फॉलोअर्सची संख्या सतत वाढत चालली आहे.

आशिका सोशल मिडिया सेंसेशन आहे, पण एके काळी तिला लोकांनी खूपच ट्रोल देखील केले आहे. पण आशिकाने निगेटिव्ह नाही तर पॉजिटिव कमेंट्सवर लक्ष दिले आणि आज ती इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. प्रश्न हा देखील आहे कि सोशल मिडिया स्टारने टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे का ?

सूरत, गुजरातची राहणारी आशिका भाटीयाने वयाच्या ९ व्या वर्षापूर्वी मीरा शोमध्ये आपल्या करियरची सुरुवात केली होती. या शोमध्ये आशिकाने मीराच्या बालपणीची भूमिका केली होती. एक चाईल्ड आर्टिस्ट म्हणून आशिकाला दर्शकांनी खूप प्रेम दिले. यांनतर ती कुछ रंग प्यार के ऐसे भी, परवरिश.. कुछ खट्टी कुछ मीठी आणि स्वाभिमान सारख्या अनेक लोकप्रिय शोमध्ये दिसली.

टीव्हीवर आपली ओळख बनवल्यानंतर आशिकाने बॉलीवूडचा रस्ता पकडला. अभिनेत्रीने आपल्या मेहनत आणि नशिबाने सलमान खानच्या चित्रपटामध्ये काम मिळवले. आशिका भाटिया, सलमान खान आणि सोनम कपूर स्टारर प्रेम रतन धन पायो चित्रपटामध्ये दिसली आहे. चित्रपटामध्ये तिने सलमान खानच्या बहिणीची भूमिका केली होती. हि तर फक्त सुरुवात होती. आशिकाला अजून पुढे जायचे होते, यामुळे ती सोशल मिडियावर शॉर्ट व्हिडीओ बनवायला सुरुवात केली.

टीव्ही आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आशिकाने सोशल मिडियावर आपले कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली. लॉकडाउनदरम्यान टिकटॉकवर आशिकाचे शॉर्ट्स व्हिडीओ खूपच व्हायरल झाले. पण काही दिवसांनंतर टिकटॉकवर बंदी घालण्यात आली.

एकीकडे टिकटॉक बंद झाले आणि दुसरीकडे इंस्टाग्राम रील्स चालू झाले. टिकटॉक स्टार बनलेले सर्व सोशल मिडिया कलाकार इंस्टाग्रामवर आले. आशिका देखील इंस्टाग्राम व्हिडीओ बनवू लागली. पण काही लोकांना तिची लोकप्रियता खटकू लागली. यामुळे त्यांनी तिला वजनावरून ट्रोल करायला सुरुवात केली. सोशल मिडिया युजर्स आशिकाच्या वाढत्या वजनामुले तिच्यावर घाणेरड्या कमेंट्स करू लागले.

हेटर्सचे कमेंट्स पाहून आशिका खचली, पण तिचे हिम्मत हरली नाही. नंतर तिने आपले वजन घटवले. आता ती सोशल मिडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टार्सपैकी एक आहे. आशिका सोशल मिडियावर लोकप्रिय होत आहे पण टीव्ही इंडस्ट्रीपासून ती दूर गेली. याचे कारण काय आहे हे कोणालाच माहिती नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts