बालपणीच्या आठवणीमध्ये प्रत्येकाला परत जावेसे वाटते, कारण त्या दिवसांमध्ये आपण टेंशन फ्री लाईफ जगतो. फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकार देखील आपल्या बालपणीचे फोटो शेयर करून आपल्या आठवणी ताज्या करता. आज आपण फिल्म इंडस्ट्रीमधील अशाच एका सुपरहिट अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो पाहणार आहोत जी आता खूपच मोठी झाली आहे आणि चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारते.
फोटोमध्ये तुम्ही जी क्युट मुलगी पाहत आहात ती फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे. जी आपल्या अभिनयासोबत आपल्या बेधडक वक्तव्यामुळे देखील नेहमी चर्चेमध्ये राहते. हि एक सुपरहिट अभिनेत्री आहे जिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. वास्तविक आपण इथे ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचे नाव साई पल्लवी आहे. अभिनेत्री साई पालवी बालपणी खूपच क्युट आणि सुंदर दिसत होती. मोठी झाल्यानंतर देखील ती विना मेकअप खूपच आकर्षक दिसते.
अभिनेत्री साई पल्लवी सेंथमारई कन्नन चा जन्म ९ मे १९९२ रोजी झाला होता. ती एक अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती एक सुंदर डांसर देखील आहे. साई पल्लवी मुख्यत: तमिळ आणि तेलगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करताना पाहायला मिळते. तिने चार फिल्मफेयर पुरस्कार दक्षिण आणि दोन SIIMA पुरस्कार सहित अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
साई पल्लवीने आपल्या करियरची सुरुवात २०१५ मध्ये मल्याळम चित्रपट प्रेमम मधून केली होती, जो तिचा आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपटा आहे. ज्यासाठी तिला निगेटिव्ह प्रतिक्रिया देखील मिळाल्या होतंय. तिने तेलगु, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काली (२०१६), फिदा (२०१७), मिडिल क्लास अब्बाई (२०१७), मारी २ (२०१८), लव स्टोरी (२०२१) आणि श्याम सिंह रॉय सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
साई पल्लवी गारगी चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती आणि याआधी ती विराट पर्वममुळे खूपच चर्चेमध्ये राहिली होती. सध्या ती अभिनेता शिवकार्तिकेयनसोबत एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. याचे नाव अजून निश्चित झालेले नाही.
View this post on Instagram