HomeBollywoodदिग्गज अभिनेता विक्रम गोखले यांचे निधन, वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा...

दिग्गज अभिनेता विक्रम गोखले यांचे निधन, वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, १८ दिवसांपासून हॉस्पीटलमध्ये सुरु होते उपचार…

दिग्गज अभिनेता विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने ८२ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. १५ दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि त्यांचे प्रकृती खूपच गंभीर सांगितली जात होती.

जेव्हापासून अभिनेत्याची प्रकृती बिघडल्याची बातमी समोर आली होती तेव्हापासून चाहत्यांपासून सेलेब्स पर्यंत सर्वजण त्यांनी ठीक होण्याची प्रार्थना करत होते, पण अभिनेता हे जग सोडून निघून गेला. माहितीनुसार अभिनेत्याचे पार्थिव बालगंधर्व सभागृहमध्ये ठेवले जाणार आहे.

एका मराठी न्यूज वेबसाईट नुअर अभिनेत्याची प्रकृती ट्रीटमेंट दरम्यान ठीक झाली होती. पण नंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती पुन्हा खराब होऊ लागली आणि नंतर त्यांची प्रकृती खूपच गंभीर झाली. विक्रम गोखले पुण्यात अभिनय अकादमी चालवत असत.

तेथे ते पत्नीसोबत अनेक वर्षांपासून राहत होते. विक्रम गोखले अभिनेत्यांच्या कुटुंबातील आहे. त्यांची आजी एक अभिनेत्री होती आणि वडील मराठी चित्रपट अभिनेते आणि रंगमंच कलाकार होते. आपल्या करियरमध्ये त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केले.

आपल्या सफल करियरमध्ये त्यांनी दिल दे चुके सनम, हे राम, तुम बिन, भूल भुलैया, हिचकी आणि मिशन मंगल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा शेवटचा चित्रपट निकम्मा याच वर्षी रिलीज झाला होता. चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी, अभिमन्यु दसानी मुख्य भूमिकेमध्ये होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts