भोजपुरी चित्रपटामधील सुपरस्टार आणि भाजप खासदार रवी किशन यांच्या कुटुंबातून पुन्हा एकदा दुःखद बातमी समोर आली आहे. वास्तविक अभिनेत्याचा मोठा भाऊ राम किशन शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. राम यांना मुंबईच्या नानावटी हॉस्पिटल दाखल करण्यात आले होते. या दुःखद घटनेची माहिती रवी किशन यांनी स्वतः आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून दिली आहे. आता राम किशन यांच्या निधनानंतर रवी किशन यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
रवी किशनने इंस्टाग्राम अकाऊंट वरून त्यांचा मोठा भाऊ रामचा एक फोटो शेयर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, दुःखद… माझा मोठा भाऊ श्री रामकिशन शुक्ला जीचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दुपारी १२ वाजता निधन झाले. महादेवासमोर प्रार्थना करतो कि आपल्या श्री चरणांमध्ये त्यांना स्थान द्यावे. ओम् शान्ति शान्ति शान्ति. अभिनेत्याची हि पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे.
अनेक चाहत्यांसोबत प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही राम किशन यांना श्रद्धांजलि देताना अनेक कमेंट्स केल्या आहेत. दिनेश लाल उर्फ निरहुआने कमेंटमध्ये ओम शांति लिहिले आहे. अभिनेत्री आम्रपाली दुबेने देखील ओम शांती लिहिले आहे. तर अक्षरा सिंहने हैराणी व्यक्त करत हे भगवान, ओम शांती लिहिले आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये रवी किशनचा आणखी एक मोठा भाऊ रमेश शुक्लाचे निधन झाले होते. रमेश दीर्घकाळापासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. चांगले उपचार करून देखील त्यांना वाचवता आले नाही. रमेश शुक्ला यांच्या निधनाला एक वर्षही पूर्ण होत नाही तोच मोठा भाऊ राम किशन शुक्ला यांनीही या जगाचा निरोप घेतला.
View this post on Instagram