HomeEntertainmentमराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा हादरली ! प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; वयाच्या ४७ व्या...

मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा हादरली ! प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधून पुन्हा एकदा दुःखद बातमी समोर आली आहे. आभाळमाया सिरीयलमधील अभिनेता पराग बेडेकर याचे निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या ४७ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. सिरीयल आणि चित्रपटांमधून दर्शकांच्या मनावर छाप सोडणारे अभिनेता पराग बेडेकरच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेत्याच्या निधनानंतर सर्व स्तरामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर प्रसिद्ध लेखक चंद्रशेखर गोखले यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेयर करत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे कि पराग गेला? उत्कृष्ट अभिनेता, खूप सहज अभिनय करायचा, त्याच्या स्वत:च्या काही खास लकबी होत्या. बोलता बोलता नाक चोळण्याची त्याची खास स्टाईल होती. मी त्यावरुन छेडलं की छान हसायचा…हास्य तर लाजवाब होतं त्याचं… कुठे गेला कुठे गेला बा शोध अचानक थांबला.”

चंद्रशेखर गोखले यांनी पोस्ट शेयर केल्यानंतर सोशल मिडिया युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय अभिनेता सागर खेडेकरने देखील परागच्या निधनानंतर पोस्ट शेयर केली आहे. त्याने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे कि, अरे आपल्याला एकत्र पुन्हा एकदा नाटक करायचं होतं ना? मग? ‘यदा कदाचित’, ‘लाली लीला’ ह्या दोन नाटकांवरच मैत्री सोडून एवढ्या लांब गेलास? गेलास तो गेलास पुन्हा कधीच भेट होऊच शकत नाही ह्या जन्मात एवढ्या लांब..? असो बरं वाटत असेल तुला कदाचित पण यार आम्हाला दुःखी करून गेलास… मिस करीन तुला यार… जिथे कुठे असशील सुखी राहा मित्रा… पऱ्या तुझ्या आत्म्यास शांती मिळो..”

पराग खेडेकर याच्या करियरबद्दल बोलायचे झाले तर त्याने यदा कदाचित, मी नथुराम गोडसे बोलतोय, पोपटपंची, सारे प्रवासी घडीचे, लाली लीला सारख्या प्रसिद्ध नाटकांमध्ये काम केले आहे. शिवाय कुंकू, चारचौघी, एक झुंझ वादळाशी, ओढ लावी जिवा, आभाळमाया यासारख्या सिरियल्समध्ये देखील तो काम करताना पाहायला मिळाला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts