HomeEntertainmentसाऊथच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्यावर पुन्हा कोसळला दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्ती निधन,...

साऊथच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्यावर पुन्हा कोसळला दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्ती निधन, काही दिवसांपूर्वीच झाले होते भाऊ आणि आईचे निधन…

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्ण घट्टामनेनीचे आज सकाळी निधन झाले आहे. ७९ वयामध्ये त्यांनी हैदराबादच्या प्राईव्हेट हॉस्पीटलमध्ये अंतिम श्वास घेतला. कृष्ण घट्टामनेनी एक प्रसिद्ध तेलगु सुपरस्टार होते. काही महिन्यांपूर्वी महेश बाबूच्या आईचे निधन झाले होते.

माहितीनुसार महेश बाबूच्या वडिलाना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृष्ण घट्टामनेनी यांच्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्वरित उपचार सुरु करण्यात आले होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कृष्णा घट्टामनेनी यांचे योगदान नेहमीच स्मरणात ठेवण्यात येईल. गेल्या दोन महिन्यांपूर्वी महेश बाबूच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या दुःखातून सावरले नाही तोच आता पंचा महेश बाबूच्या कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अभिनेत्यासाठी हा खूपच मोठा धक्का आहे. वडिलांच्या निधनानंतर महेश बाबू पूर्णपणे खचला आहे. महेश बाबू नेहमी आपल्या वडिलांचे फोटो शेयर करायचा. आईवडिलांचे हे फोटो नेहमीच माहेच बाबूच्या सोबत राहणार आहेत ज्या त्यांच्या आठवणी आहेत.

तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कृष्ण घट्टामनेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. जेव्हापासून चाहत्यांना कृष्ण घट्टामनेनीच्या निधनाबद्दल माहिती झाले आहे, त्यांना देखील दुख अनावर झाले आहे. महेश बाबूचे कुटुंब सध्या खूपच अडचणीमधून जात आहे.

महेश बाबूचे वडील कृष्णा तेलगु इंडस्ट्रीमधील खूप मोठे स्टार राहिले आहेत. कृष्णा यांचे खरे नाव घट्टामनेनी शिवा रामा कृष्णा मूर्ति आहे. त्यांनी फक्त चित्रपटांसाठी आपले नाव कृष्णा ठेवले होते. ते अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता तर होतेच त्याचबरोबर ते एक राजकारणी देखील होते. आपल्या ५ दशकाच्या करियरमध्ये त्यांनी जवळजवळ ३५० चित्रपटांमध्ये काम केले. कृष्णा यांना पद्मविभूषणने देखील सन्मानित केले गेले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts