HomeBollywoodसिनेसृष्टी पुन्हा हादरली ! १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या दिग्गज अभिनेत्याचे...

सिनेसृष्टी पुन्हा हादरली ! १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या दिग्गज अभिनेत्याचे नि’धन, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

मनोरंजन क्षेत्रामधून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अनेक चित्रपट आणि टीव्ही सिरियल्समध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारे अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले आहे. अरुण बाली यांनी व्या ७९ व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार सकाळी ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम देखील केले आहे.

अरुण बाली अनेक दिवसांपासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. अरुण बाली हे मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होते. हा एक ऑटोइम्यून आजार आहे. जो नर्व्स आणि मसल्स दरम्यानच्या कम्युनिकेशन फेलियरमुळे होतो.

अरुण बालीच्या निधनाने टीव्ही आणि बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक सेलेब्स आणि चाहते सोशल मिडियावर शोक व्यक्त करत आहेत. चाहते त्यांच्या आत्म्याच्या शांतीची कामना करत आहेत.

अरुण बालीने आपल्या करियरची सुरुवात ९० च्या दशकामध्ये केली होती. त्यांनी राजू बन गया जेंटलमन, खलनायक, जब वी मेट, फूल और अंगारे, केदारनाथ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या अभिनयामधून दर्शकांच्या मनावर छाप सोडली. याशिवाय ते बाबुल की दुआं लेती जा, कुमकुम सारख्या सिरियल्समध्ये देखील दिसले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts